संसाराचा गाडा चालवण्याची जबाबदारी चिमुकलीवर



जागतिक महिला दिनाच्या दिवशी ही तिला करावी लागली कसरत

******************************************

 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  आज दिवसभर महिलांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सोशल मीडिया वरून शुभेच्छा देऊन कोडकौतुक केलं जात आहे असे असतांना इकडे मात्र सहा वर्षाच्या चिमुकलीला या दिवशीही संसाराचा गाडा चालवण्यासाठी संगीताच्या तालावर दोरावर चालण्याची कसरत करून लोकांचे मनोरंजन करावे लागले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  पोटासाठी भटकंती करणाऱ्या  महिलांचे दुःख कधी कोणाला दिशेल का ? हा प्रश्न सर्वसामान्य दिसून येऊ लागला आहे.

 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून  सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा मोठा सन्मानही समाजाकडून केला जातो. महिला निर्भय आणि सक्षम झाली पाहिजे यासाठी महिला सबलीकरणावर  मोठमोठे भाष्यही केले जातात प्रत्यक्षात मात्र महिला किती असुरक्षित किती वंचित आणि किती उपेक्षित आहेत हे वास्तव उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावरच नजरेत येते. एकीकडे जागतिक महिला दिनाच्या दिवशी सोशल मीडिया वरून आपल्या  आई,बहीण, काकी,मामी वहिनी, या माता-भगिनी इतर नात्यातील महिलांचे  समाजामध्ये ठळक काम करणाऱ्या महिलांचे माणसाकडून  किंबहुना समाजाकडून  कोड कौतुक पोवाडे गाऊन महिला बद्दल कृतज्ञता व्यक्त करत शुभेच्छा दिल्या जातात. यामुळे जागतिक महिला दिन हा महिलांच्या  सबलीकरणावर चळवळ करणार दिन आहे असे वाटू लागते.तर दुसरीकडे याच दिवशीही सहा वर्षाच्या चिमुकलीला आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन उंच उंच दोरावर चालण्याचा जीवघेणा खेळ सादर करून समाजाचं मनोरंजन करावं लागतं असेल तर हे विदारक चित्र जागतिक महिला दिनाच्या संकल्पनेला हरताळ फासणारे ठरत आहे.

 शिरूर कासार तालुक्‍यातील तिंतरवणी येथे मुंबई -विशाखापटनम या महामार्गालगत बस स्टॅन्ड वरती माणसांची वर्दळ पाहून छत्तीसगडहुन पोट भरण्यासाठी महाराष्ट्र दाखल झालेलं एक कुटूंब सकाळीच आपला खेळ सादर करत होत. कुटुंबातील  निसा नावाची  सहा वर्षाच्या चिमुकली आजूबाजूच्या वाहनाच्या वर्दळीत आपल तूसभरहि लक्ष विचलित न होऊ देता उंच बांधलेल्या   दोरा वरती कसरतीचा खेळ सादर करत होती. नाकाच्या शेंड्यावर एक लक्ष केंद्रित करत वेगवेगळ्या प्रदर्शन सादर करत होती. हा खेळ पाहताना कुणाच्याही अंगावर काटा उभा राहावा. अगदी बोटाला धरून चालण्याचे तिचे ते वय  खेळण्या-बागडण्याच... मात्र याच वयात  हा कसरतीचा खेळ करून कुटुंबातील सात सदस्यांच्या पोटाची खळगी भरण्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर पडलेली असल्याने या खेळातील तिची एक अग्रता तिच्यावर पडलेल्या   जबाबदारीची मोठी साक्ष देत आहे. रोज  या नाहीतर त्या गावांमधून हजार पाचशे रुपये मिळावेत यासाठी भटकंती करणार छत्तीसगड मधील विलासपूर जिल्ह्यातील कुटुंब चिमुकलीचा खेळ बीड जिल्हात  करत फिरत आहेत. जिल्ह्यामध्ये एकीकडे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडत आहे तर दुसरीकडे  या चिमुकलीला कसरतीचा खेळ करून लोकांचे मनोरंजन करावे लागत आहे. यामुळे जागतिक महिला दिनाचा आनंद कधी या मुलीच्या जीवनात येईल का असा प्रश्न यानिमित्ताने उद्भवू लागला आहे.

एक आदर्श व्यक्तिमत्व किर्ती ताई पांगारकर

       आज जागतिक महिला दिन आहे  महिलांना विषयी कृतज्ञात व्यक्त करण्या साठी जे कार्य  केले आहे हे सर्वांना समजण्यासाठी आजच्या दिवसा सारखा दुसरा दिवस कोणता असणार....

     बीड शहरात अनेक शाळा आहे आणि त्या शाळे मध्ये विद्यार्थी घडवण्याचे काम होत असते पण आशा काही शाळा आहेत की त्याचे कार्य खरंच उलेखनिय आहे . बीड शहरातील एक आदर्श शाळा विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड ही मागास व कामगार असणाऱ्या परिसरात ज्ञान हे नदीप्रमाणे वाहत राहिले पाहिजे ही संकल्पना घेऊन बीड जिल्ह्याच्या माजी खासदार माननीय केशरबाई क्षीरसागर यांनी या भागाचा शिक्षणाचा अभाव लक्षात घेता 1965 साली या शाळेची स्थापना पेठ बीड या भागात केली.  शाळा हे माझे कुटुंब आहे अशा मानणाऱ्या शाळेच्या कुटुंबप्रमुख मुख्याध्यापिका किर्ती ताई पांगरकर व त्यांच्या सर्व 28 शिक्षक करता आहे .

 शाळेच्या मुख्याध्यापिका किर्ती ताई पांगरकर  आपल्या  सोबत सर्वांना घेऊन या भागातील गरीब आणि गरजुवंत मुलांना शिक्षण आणि शिक्षणाच्या सुविधा देत आहे . 

    अस म्हणतात ज्या  शाळेचे मु अ महिला असते तेथे काम कसं होत असेल काय होत असेल अस आपल्याला नेहमी  प्रश्न पडतो परंतु विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिक म्हणून श्रीम.कीर्ती ताई पांगारकर  आपण खूप जवाबदारीने  निभावत आहेत.

 एक विशेष बाब सांगायची ठरली तर या शाळेत 28 पैकी 15 महिला कर्मचारी आज पुरुषाच्या खाद्याला खांदा लाऊन काम करत आहे व शाळेचे नाव  नावलौकिक करत आहे.

 आदरणीय ताई आपल्या विविध कल्पना मधून अनेक उपक्रम आपण  शाळेत राबवत आहात .प्राथमिक शिक्षण हा जीवनाचा पाया असतो .  म्हणून  बाल मनावर चांगले संस्कार करण्यासाठी अनुभवी शिक्षिका व शिक्षक  यांच्या बरोबर मिळून शाळेचा  गाडा पुढे नेण्यासाठी खरंच आपण खूप तत्पर  आहात.

  कष्टकरी कामगार श्रमिक वर्ग असलेला हा परिसर हातावर पोट भरणारे कुटुंबे सकाळी कामाला गेले तर संध्याकाळी चूल पेटते अशा आर्थिक विवंचनेत जगणारी ही माणसे त्यांच्या मुलांची जिम्मेदारी आपण आपल्या खांद्यावर घेतात .

   शाळाबाह्य मुलांना,गोरगरिबांच्या मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करत असतात.मनाची जाणीव ओळखून विद्यार्थी केंद्रित संरचनात्मक  अध्यापन कौशल्य विकसीत करून शाळेचा प्रत्येक विद्यार्थी हा यशस्वी होण्यासाठी नेहमीच आपली भूमिका सकारात्मक असते.

    मुलांच्या गणवेशाचा खर्च ही स्वतः ताई. आपण उचलतात  एक सारख्या गणवेशात बसणारी मुले आणि मुली त्यांच्या नवीन गणवेश यांचा रंग आणि पुस्तकांचा सुगंध मनामध्ये रुजवतात. ताई आपल्या कडून नैतिक मूल्य जोपासली जातात. वक्तृत्व कर्तृत्व व नेतृत्व हे शाळेतूनच घडते त्यांचा पाया शाळेतच रचला जातो. या कलागुणांना वाव देण्यासाठी मुलांमध्ये स्टेजकरियर निर्माण व्हावे,मुले पुढे यावीत यासाठी विविध स्पर्धेच्या मधून मुलांमध्ये नेता-अभिनेता कलावंत शिक्षक चित्रकार संगीतकार शोधण्याचा प्रयत्न आपण  करत असतात व त्यांना प्रोत्साहन देत असतात जे विद्यार्थी या भट्टीतून तावून सुलाखून निघतात त्यांचा गुणगौरव  ताई आपण  मोठ्या थाटामाटात करतात.

  विज्ञानाचे जग काय असते हे बाल मना समजावे नवीन शोध नवीन संशोधने ज्या शास्त्रज्ञांनी केली त्यांचे आविष्कार हे विज्ञान प्रदर्शनातून दर वर्षी आपण शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवतात .

     झाडांचे महत्त्व मुलांना समजावे म्हणूनआपल्या  मार्ग दर्शना खाली शहरातून वृक्षदिंडी काढून हीच झाडे शाळेच्या परिसरात लावली जातात.तसेच सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी राबवलेला उपक्रम सह्याद्री देवराई या वृक्षांचे जे संमेलन भरले त्या संमेलनातही मुलांनी सहभाग सक्रिय सहभाग आपण नोंदवलं त्याची दखल स्वतः सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांनी घेतली.

    खिलाडू वृत्ती मुलात निर्माण व्हावी त्यांच्यातला खेळाडू मैदानात यावा तो तालुक्यापासून तर राज्यापर्यंत खेळावा शाळेचे नाव लवकि करण्यासाठी त्याने मैदाने गाजवावी यासाठी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन ताई आपल्या मार्ग दर्शना खाली केले जाते.

     आदर्श व्यक्ती होण्यासाठी आदर्श लोकांचे चारित्र्य जाणे फार महत्त्वाचे आहे महापुरुषांच्या ओळख होणे महत्त्वाचे आहे यासाठी महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या च्या माध्यमातून आपण त्यांचे मूल्ये जोपासणे फार महत्त्वाचेकार्य करत आहात.

    एक आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्या मुलांमधील कला जेव्हा आई-वडील स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात तेव्हा त्यांचे डोळे भरून येतात आणि अभिमानाने छाती फुगते व आपला मुलगा मुलगी स्टेजवर जेव्हा हजारो लोकांच्या समोर आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करते तेव्हा खरंच शाळेचे नाव लौकिक तर होणारच या साठी आपण दरवर्षी स्नेह संमेलन सारखा कार्याकर्म  घेतात हे ही खूप स्तुतीजन्य आहे.

   कोरोनाच्या कठीण परिस्थितीतमध्ये  शाळेतील प्रत्येकाची काळजी करत होत्या खुप आधार देतात हे आवर्जून सांगावेसे वाटते.आतापर्यंत आम्हीं देव देवळात आहे असे म्हणत होतो पण माणसातला देव आज आम्ही साक्षात पाहतो आहे . प्रत्येक शाळेतील शिक्षक शिक्षिका यांच्या सुख दुःखात ताई नेहमी पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात हे आवर्जून सांगावेसे वाटते.

      आपणा आम्हा सर्वांच्या आधार, प्रेम माया, ममता,आपुलकीची जाणीव ठेवणाऱ्या किर्तीताई तुम्हीं खुप महान आहात म्हणून या महिला दिनाचे औचित्य साधुन आपल्या शांत,संयमी स्वभावाचे गुण जागृत करून आपला आदर, सन्मान करणं हे आम्हांस योग्य वाटते.

    एक महिला प्रशासक म्हणून, शाळेच्या प्रमुख म्हणून, शाळेच्या आधार असणाऱ्या किर्तीताई तुमचे कामही खुप मोलाचे आहे.या महिला दिनाच्या प्रसंगी आपल्यातील मोठेपणा, अंगीकृत गुण, तत्परता, जबाबदारी ही गोरगरीब विद्यार्थी व आम्हां शिक्षक, शिक्षकांसाठी लाख मोलाची आहे.

'लहानांच्या चुका ती..

स्वतावर घेत असते..

करते त्रास सहन स्वत ती..

लहानांचा आधार ती बनत असते..

अशी ती " ताई " असते'..

आभाळाएव्हढी माया तुमची आम्हांवरती राहू द्या, तुमचे विचार सामाजिक, शैक्षणिक, राजकीय जबाबदाऱ्या आम्ही यशस्वीपणे पूर्ण करून आणखी चांगले कार्य, कर्तव्य निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपले हे कार्य पाहून आपला सन्मान एक महिला म्हणून करावासा वाटतो. तुम्हांस जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐💐

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ

    महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ  इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांपासून ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत आणि पवित्र मंदिरांपासून सांस्...