*बीड जिल्हा रिंग बॉल टीमने राज्यस्तरीय अजिंक्य पद स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले*
बीड (प्रति) दिनांक 3 मार्च 2019 नाशिक येथे रिंग बॉल स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धा क्लासिकल असोसिएशन महाराष्ट्र, नाशिक जिल्हा क्लासिकल रोलिंग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. यामध्ये रिंग बॉल व क्लासिक गेम असे प्रकार घेण्यात आले.
या स्पर्धेमध्ये बीड जिल्हा संघाने भाग घेऊन सुवर्ण पदक पटकावले .या विजय संघातील खेळाडू अनिकेत शिंदे, रेहान पठाण, ध्रुवा कानडे, मयुरेश जायभाय, विठ्ठल शिराळे, अभिजीत बोबडे ,अभिजीत मते ,आयुष शर्मा ,विठ्ठल कोठारी, प्रज्वल लोढा ,यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय रिंग बॉल स्पर्धेचे सुवर्ण पदक पटकावले. या विजयी संघाला प्रशिक्षक रामदास गिरी व विशाल गिरी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्याधर, बीड जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अड .राजेंद्र बन रविंद्रजी दळवी वैभव गिरी प्राध्यापक सुरज माळी अन्य प्रशिक्षक व पालकांनी मुलांचे कौतुक केले पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्फूर्तीचा अखंड झरा
आमच्या आधार "किर्तीताई" आभाळाएव्हढी माया तुमची आम्हांवरती राहू द्या* ......
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांची शाळेविषयी असणारी आत्मीयता खुप काही सांगुन जाते.प्रसंग सुखाचा असो वा दुःखाचा शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्या आधार व आसरा देणारी ममता या व्यक्तीमत्वात दिसून येते.शांत व संयमी स्वभाव प्रत्येकाला भावनिक प्रगल्भता देतो.आपली शाळेतील प्रत्येक लहान मुला मुलींच्या स्वप्नामध्ये असणाऱ्या भावविश्वात रमून त्यांच्या आनंदात लहान होऊन आपलेपणाची भावना निर्माण होतांना आम्हीं पाहतो आहे. जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यासाठी चांगले सत्कार्य आवश्यक आहे असे त्या नेहमी म्हणत असतात ते शब्द ते विचार काहीतरी चांगले करण्यासाठी आम्हाला प्रेरणा देणारे वाटतात. शाळेमध्ये अनेक कौशल्य पारंगत लोक सांभाळण्याची कला आपल्या शांत व संयमी स्वभावाने कशी हाताळतात ते कळत नाही.काहीतरी जादू त्यांच्या स्वभावामध्ये आहे.शाळेच्या मूलभूत विकासासाठी, शैक्षणिक गुणवत्तेसाठी सतत त्या नवनवीन कल्पना सुचवुन अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील असतात.
तुम्ही आमच्या आदर्श आहात,
प्रेरणा आहात.उपक्रमशील विचारांचे एक साक्षात विद्यापीठ असणाऱ्या ताईंचे कौतुक करावे वाटते. प्रत्येक दिवशी नवीन नवीन व्यक्तिरेखांच्या भूमिकेतून शाळेची जबाबदारी सहजतेने निभावत असतात.सर्वाना सोबत घेऊन प्रत्येक गोष्टीचा सारासार विकास करण्यासाठी त्या पुढाकार घेत असतात.
कधी कठोर रागाने बोलल्यानंतरही हळुवारपणे स्वतः दुःखी होऊन तितक्याच भावनेने रागावर नियंत्रण ठेवून काळजी घेण्याचे काम त्या करतात याचा आम्हाला खुप खुप हेवा वाटतो.आम्हीही आमची चुक सुधारून,राग विसरून तितक्या क्षणांचा राग विसरतो व पुढील कामाला लागतो.मनात काहीही ठेवत नाही काही झालेच नाही ही भूमिका घेऊन काम करू लागतो. ही कला आम्हांला ताई तुमच्या आदर्शरूपी स्वभावातून आम्हांला दिसते.शाळेचा प्रत्येक घटक आपला परिवार आहे त्यासाठी त्या कार्य करत आहे.एक महिला उत्तम प्रशासन चालवण्याचा तुम्हीं आदर्श आहात हे मोठ्या आत्मीयतेने आम्हांला सांगावेसे वाटते.ते शब्दांमध्ये प्रतिबिंबित करतांना सुचत नाही परंतु या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्हांला आपल्या कृतज्ञता व्यक्त कराव्या वाटतात. अनेक महिला आज जागतिक स्तरावर आपल्या कर्तव्याने कीर्ती करून देशाच्या इतिहासात अजरामर होऊन गेल्या. त्यांच्या शौर्याच्या गोष्टी अभिमानाने आपण सांगत असतो. तशाच आमच्या शाळेच्या प्रमुख किर्तीताई, भारतीताई यांच्या शांत व संयमी हसमुख व्यक्तिमत्वाचा प्रभाव खूप काही आम्हांला स्वाभिमान शिकवून जातो.त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम मोठ्या जबाबदारीने आम्हीं पार पाडत असतो.शाळेच्या सर्व महिला शिक्षिका या पण ताईंच्या विचाराने उत्कृष्ट अध्यापन करत असतात, त्यांना पण या महिला दिनाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा.
आपल्या शाळेतील शिक्षक जमाले सर यांच्या आरोग्यासाठी कीर्तीताई नेहमी खुप आधार देतात हे आवर्जून सांगावेसे वाटते.आतापर्यंत आम्हीं देव देवळात आहे असे म्हणत होतो पण माणसातला देव आज आम्ही साक्षात पाहतो आहे या गोष्टीवरून समजून येते,नाहीतर जमाले सर आजपर्यंत जगले नसते.हे आम्हीं जवळून पाहतो. प्रत्येक शाळेतील शिक्षक शिक्षिका यांच्या सुख दुःखात किर्तीताई नेहमी पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात हे आवर्जून सांगावेसे वाटते.
आपल्या शाळेतील मुंडे मॅडमच्या मुलाच्या लग्नास नाशिकला गेलो होतोत.लग्न समारंभ दुपारी आटोपल्यावर आपण आम्हांला दिंडोरीला दर्शनाला बोलावून घेतले.आम्हांला माऊलींचे दर्शन होण्यासाठी खूप आतुरतेने तळमळ करत होतात त्यामुळेच माऊलींचे दर्शन आम्हांस लाभले. आम्हांला स्वामी समर्थ महाराजांचे पुस्तक ग्रंथ भेट दिला. तो ग्रंथ खुप महत्वाचा आहे. आपल्या शाळेतील मुला मुलींच्या संस्कारासाठी तुम्हीं या ग्रंथाचे वाचन करून शाळेत आपल्या मुलांना संस्कारीत करा असे म्हणाल्या.त्याक्षणी किर्तीताई यांच्यामध्ये आपल्या शाळेसाठी किती आत्मीयता आहे हे दिसून आले.त्यानंतर आम्हांला वेगवेगळे आयुर्वेदीक वस्तू आरोग्यासाठी घ्या म्हणाल्या. त्या दुकानाकडे जात असताना आरोग्यासाठी आवश्यक विविध औषधी वस्तु खुप चांगल्या आहेत असं सांगत होत्या. त्यामध्ये त्यांची आमच्याविषयी असणारी काळजी दिसून येत होती.त्यानंतर आम्हां सर्वांना शरबत पिऊ घातलेव गाडीकडे आम्ही निघालो.दुपारचे 5 वाजले होते.किर्तीताई म्हणाल्या बीडला रात्रीं जाण्यास उशीर होणार आहे त्यामुळे आपण सगळे दोन्हीही गाड्या सोबत जाऊ अस म्हणाल्या.ताईंनी गाडी चालकास सांगितले की आपल्या दोन्हीही गाड्या सोबत बीडला जातील.आमच्याअगोदर किर्तीताइंची गाडी लवकर बीडला पोहचणार होती पण त्यांची गाडीही आमच्या सोबत राहिली.यापाठीमागे किर्तीताईंचा दुरदृष्टिपणा दिसून येतो एक महिला असताना सुद्धारात्रीचा प्रवास असल्यामुळे रस्त्यात काही अडचण येऊ नये म्हणून त्या आमच्यासाठी रात्रभर आमच्या गाडीच्या पाठीमागे होत्या.पठाण सरांना वेळोवेळी संपर्क करण्यास सांगत होत्या. गाडी वेगाने चालवू नका,झोप येत असेल तर वाटेत चहा घ्या असं वेळोवेळी असणारी काळजी त्या नाशिक बीड च्या प्रवासामध्ये किर्तीताई घेत होत्या हे आवर्जून आम्हाला सांगावे वाटते. किती आपुलकी, किती आत्मीयता किर्तीताई च्या स्वभावातून ओसंडून वाहते ते शब्दांमध्ये आम्हाला त्याचे रेखाटन करता येणार नाही म्हणून अशा आपल्या सर्वांच्या आधार, प्रेम माया, ममता,आपुलकीची जाणीव ठेवणाऱ्या किर्तीताई तुम्हीं खुप महान आहात म्हणून या महिला दिनाचे औचित्य साधुन आपल्या शांत,संयमी स्वभावाचे गुण जागृत करून आपला आदर, सन्मान करणं हे आम्हांस योग्य वाटते.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या किर्तीताई सदैव मार्गदर्शकाची भुमिका साकारत शैक्षणिक नवनवीन कल्पना, तीची जोपासना,अंमलबजावणी, गोरगरीब विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक मोफत साहित्य वाटप करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करतात याचा आम्हांला खुप खूप अभिमान वाटतो. अशी मदत, सहकार्य, अशा गरीब,वंचीत मुलांना आधार त्या विविध प्रकारचे उपक्रम राबवून करत असतात, एक महिला प्रशासक म्हणून, शाळेच्या प्रमुख म्हणून, शाळेच्या आधार असणाऱ्या किर्तीताई तुमचे कामही खुप मोलाचे आहे.या महिला दिनाच्या प्रसंगी आपल्यातील मोठेपणा, अंगीकृत गुण, तत्परता, जबाबदारी ही गोरगरीब विद्यार्थी व आम्हां शिक्षक, शिक्षकांसाठी लाख मोलाची आहे.आभाळाएव्हढी माया तुमची आम्हांवरती राहू द्या, तुमचे विचार सामाजिक, शैक्षणिक, राजकीय जबाबदाऱ्या आम्ही यशस्वीपणे पूर्ण करून आणखी चांगले कार्य, कर्तव्य निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपले हे कार्य पाहून आपला सन्मान एक महिला म्हणून करावासा वाटतो. तुम्हांस जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐💐

गांधीनगर विभाग आनंदनगरी आयोजन
*विनायक प्राथमिक शाळेत आनंदनगरी उत्साहात संपन्न*
बीड प्रतिनिधी- दि.13 फेब्रुवारी या दिवशी विनायक प्राथमिक शाळेत खरी कमाई उपक्रमाअंतर्गत आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले. या आनंदनगरी चे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ सपकाळ सर,पत्रकार इम्रानजी शाह यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी बीड न.प. नूतन सभापती इलियासजी सय्यद,सामाजीक कार्यकर्ते कालूजी बेग, समस्त विद्यार्थी पालक महेबूब बागवान, शंकर गायकवाड, तौफिक बागवान, अनिस शेख,शाळेतील श्रीमती भारतीताई क्षीरसागर मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम,सेवानिवृत्त शिक्षिका तायडे मॅडम, बाळू काळे सर,उत्तरेश्वर भारती सर,सुनीता चौधरी मॅडम, अशोक काशीद सर, शिवलिंग क्षीरसागर सर,दिलीप तकीक सर,तन्वीर पठाण सर,अजिंक्य चांदणे सर,अजीजराजा शेख सर,विवेक गव्हाणे सर, गणेश भागडे सर, अमोल पाटोळे सर,सिमा उदगीरकर मॅडम,प्रतिभा वाघमारे मॅडम,मनीषा चौधरी मॅडम,रिता वाघमारे मॅडम,म्हेत्रे मॅडम,मुंडे मंगल मॅडम, संजीवनी पवळ मॅडम,अनिल लेहणे सर,शहेबाज शेख सर, नईम पठाण सर,अंकुर इंग्लिश स्कुल च्या शिक्षिका मिस पठाण मॅडम, मिस भोसले मॅडम,मिस शाहीन मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.शाळेतील लहान मुला-मुलींनी आपापले खाऊंचे दुकाने लावली होती.जो तो खरी कमाई करण्यात दंग होता.ही लहान मुले मोठ्या कौतुकाने आपले दुकान चालवत होती. विदयार्थी व त्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताईनी प्रत्येक मुलांच्या दुकानाची भेट घेतली व मोठ्या आपुलकीने त्या मुलांशी व्यावहारिक ठोकताळे ,दुकानातील खाऊं प्रत्यक्ष खरेदी करून विद्यार्थ्यांना खरी कमाई यांचे महत्व समजावून सांगत होत्या.शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी या आनंदनगरी मध्ये मुलांनी तयार करून आणलेले पदार्थ खरेदी करून त्यांना व्यवहाराचे महत्व समजावून सांगितले.या आनंदनगरी मध्ये वडापाव, कचोरी,समोसे,पापड, गुलाबजामुन,भेळपुरी,चहा,खमंग ढोकळा,अननस,चिक्की, पाणीपुरी,शैक्षणिक साहित्य,मजेशीर विविध खेळ, गंमती जमती,पावभाजी, शेंगदाणे, पाणी, गाजर हलवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपआपले टॉल मुलांनी लावले.यातून त्यांनी खूप खरी कमाई केली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताईंनी या खऱ्या कमाईचे महत्व सांगून खरी कमाई आपल्याला स्वावलंबन शिकवते.व्यावहारीक ज्ञान कळते,आपल्याला नफा तोटा कळतो, नफा कसा मिळवायचा यासाठी आपण प्रयत्न करतो, जीवन जगण्यासाठी पैसे कमवावे लागतात यासाठी तुम्ही अभ्यास करा, मोठे व्हा, नोकरीला लागाल,काम कराल, मेहनत कराल तेंव्हा त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला पैसा मिळेल हीच तुमची खरी कमाई तुम्हांस स्वावलंबी बनवून तुमच्या जीवनात आनंद निर्माण करील अशा आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांनी आनंदनगरीच्या समारोपाप्रसंगी मत व्यक्त केले. शाळेतील शिक्षकांनी मुलांना खऱ्या कमाईचे महत्व समजावून सांगितले.या आनंदनगरी कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी लक्ष्मण फुलमाळी,लक्ष्मण चव्हाण मामा यांचे मोलाचे योगदान लाभले.

आदर्श व्यक्तिमत्व : तनवीर पठाण सर
शिक्षण या पवित्र क्षेत्रात काम करत असताना कळत नकळत विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारे शिक्षक खूप महत्वाचे असतात..शिक्षक म्हटलं की अंगात भीती वाटत असायची आज आनंददायी शिक्षणाबरोबर ज्ञानरचनावाद व मनोरंजनातून शिक्षण द्यावे लागते त्या भूमिका त्या कल्पना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उतरवण्यासाठी शिक्षकाचे कौशल्य खूप महत्वाचे असते .असेच विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथील शिक्षक त्यांच्या कामाचे कौतुक करावे ते थोडे होईल.अंगामध्ये असणाऱ्या उपजत कलांना ओळखून त्या प्रत्यक्षपणे अनुभवातून प्रगट करून दगडाला आकार देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारा शिक्षक खूपच महत्वाचा आहे.परिस्थिती कशीही असुद्या पण सक्षमपणे पेलवण्याची टाकत ठेवतो तो शिक्षक खूपच महत्वाचा वाटतो.
आमच्या शाळेतील पठाण तन्वीर सर हे एक अनमोल रसायन आहे.विविध प्रकारच्या कला गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या आपल्या शिक्षक सहकाऱ्यांचे कौतुक करावे ते थोडे असेल..अंगी , मनी एकच ब्रीद व तळमळ लक्षात घेता त्याप्रमाणे हसत खेळत विद्यार्थी हे आपले दैवत समजून पूर्णपणे त्यामध्ये झोकून देणारा व्यक्ती आम्ही जवळून बघितलाय.
अशा या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या कार्याची नोंद घेऊन वेगवेगळ्या कलांमध्ये निपुण असणारे व्यक्तिमत्व खूप उजळावे, हर्षावे, उंच उडावे म्हणून सतत कलात्मक प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या क्षेत्रामधून सामाजिक ,शैक्षणिक योगदानाबद्दल दिले जाणारे पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक वाटचालीच्या यशातील बक्षीस असते.
तन्वीर पठाण सर एक हुशार व हजरजबाबी माणूस खूप महत्वाचा आहे त्यांना वेगवेगळया सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दिला जाणारा पुरस्कार आणखी बळ वाढवणारे असते. तन्वीर पठाण सरांना आपल्या अल्पावधीच्या कालावधीतून मिळालेले पुरस्कार हे यशाचे लाखमोलाचे आहेत.सतत विद्यार्थी व तन्वीर पठाण सर हे आपल्या कामावर मन लावून लहान होऊन आनंद घेत असतात.
या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना अत्यंत प्रभावीपणे आपल्या कौशल्याने आत्मविश्वासाने समरस होऊन विद्यार्थी दैवताच्या पूजनेसाठी नवनवीन सहशालेय उपक्रमाची व अभ्यासाची गोडी लावणारा अवलिया खूपच प्रेरणादायी असतो.तन्वीर पठाण सरांच्या या अनमोल योगदानाबद्दल त्यांचे संपूर्ण जीवनप्रवास शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही .अनेक व्यक्तीच्या नावाने दिले जाणारे आदर्श पुरस्काराचे मानकरी आम्हां सोबती लाभले याचा सार्थ अभिमान आम्हांस वाटतो.
त्यांची प्रेरणा, मार्ग, दिशा ही समर्थपणे चालवण्यासाठी आम्हांस ती प्रेरक ,दिशादर्शक ठरेल यांचा आम्हाला हेवा वाटतो म्हणून त्यांच्या शैक्षणिक कार्यांचा हा लेखाजोखा याचे बक्षीस म्हणजे त्यांना मिळालेले विविध आदर्श शिक्षक पुरस्कार हे त्यांचे भाग्य कर्म यांचे यथार्थपणे स्वीकारलेले अंगीकृत असे बक्षीस वाटते...
त्यांच्या या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानांकन दिलेल्याव त्यांना निवडलेल्या विविध प्रतिष्ठानचे कौतुक करावे ते थोडे असेल..
अशा हुरहुन्नरी व हसमुख व्यक्तित्वास पुढील शैक्षणिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!
श्री गव्हाणे सर
पुरस्कार अभिष्टचिंतन, पठाण तन्वीर सर
श्री. पठाण तनवीर बाबासाहेब
आदर्श शिक्षण संस्था,बीड विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथे गेल्या 13 वर्षापासून सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. ही शाळा स्व.खा. केशरकाकू क्षीरसागर यांनी लावलेलं रोपटे तिचा वटवृक्षात रूपांतर झाले आहे.आ. जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेब यांच्या आशीर्वादाने या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही शाळा प्रगतीपथावर आहे या शाळेत पेठ भागातील गरीब कुटुंबातील मुलं मुली शिक्षण घेत आहे या मुलांचे आई वडील मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात त्याशिवाय त्यांच्या घरातील चूल पेटत नाही हे शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांना माहिती आहे म्हणून मुख्याध्यपिका किर्तीताई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलं चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजेत, शाळेत आली पाहिजे त्यांची जी काही अडचणी असतील त्या आपण सोडवू त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करू हे एक अवघड होते पण हे काम शाळेतील शिक्षक पठाण तन्वीर बाबासाहेब यांनी विविध स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या सर्व मुलांना शालेय साहित्य मिळवुन दिले
शाळेत कार्यरत झाल्या पासून
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड ,सतत पालक संपर्क करून मा मुख्यध्यापिका कीर्ती ताई पांगारकर याचा मार्गदर्शनाने व सहकार्याच्या मदतीने विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढवली.वृक्षारोपण, प्रत्यक्ष मूर्ति कशी बनवतात प्रत्यक्ष पाहणी करून विदयार्थ्यांना उद्योग कौशल्याची माहिती दिली. वेगवेगळ्या संकल्पना शाळेत राबवुन त्या प्रत्यक्ष पणे साकारण्यासाठी धरपड करत विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव दिला.शिक्षणाच्या या प्रवाहात कुणीही वंचीत राहू नये म्हणून शाळाबाह्य मुलांना शाळेची गोडी लावण्यासाठी
कुलूप सारख्या लघुचित्रपट निर्माण करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न सर्वांसमोर मांडला या चित्रपटास राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. शाळेमध्ये विविध उपक्रम मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे राबवण्यासाठी सदैव तत्पर असतात.
दन्त शिबीर,सामाजिक प्रबोधन कार्यक्रम,कब बुलबुल पथकाचे संचालन,सलग दोन वर्षे क्रमांक1,2 पटकावला.शाळेत सहकार्याच्या मदतीने विविध संस्थेचे कार्यक्रम शाळेत राबवले.रोटरी क्लब,सेवाभावी संस्था, व स्वखर्चातून मुलांन साठी शालेय साहित्यची मदत केली.या
कार्याची दखल घेऊनअनेक संस्थांनी त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून विविध पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे , त्यांच्या कार्याचा हा आलेख उंच उंच गगनभरारी घेत आहे म्हणून आज पुन्हा त्यांच्या यशस्वी कार्याची सामाजिक उपक्रमाची कामगिरी बघून शिक्षण क्षेत्रातील हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे

Subscribe to:
Posts (Atom)
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांपासून ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत आणि पवित्र मंदिरांपासून सांस्...