*बीड जिल्हा रिंग बॉल टीमने राज्यस्तरीय अजिंक्य पद स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले*
बीड (प्रति) दिनांक 3 मार्च 2019 नाशिक येथे रिंग बॉल स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धा क्लासिकल असोसिएशन महाराष्ट्र, नाशिक जिल्हा क्लासिकल रोलिंग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. यामध्ये रिंग बॉल व क्लासिक गेम असे प्रकार घेण्यात आले.
   या स्पर्धेमध्ये बीड जिल्हा संघाने भाग घेऊन  सुवर्ण पदक पटकावले .या विजय संघातील खेळाडू अनिकेत शिंदे, रेहान पठाण, ध्रुवा कानडे, मयुरेश जायभाय, विठ्ठल शिराळे, अभिजीत बोबडे ,अभिजीत मते ,आयुष शर्मा ,विठ्ठल कोठारी, प्रज्वल लोढा ,यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय रिंग बॉल स्पर्धेचे  सुवर्ण पदक पटकावले. या विजयी संघाला प्रशिक्षक रामदास गिरी व विशाल गिरी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्याधर, बीड जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अड .राजेंद्र बन रविंद्रजी दळवी वैभव गिरी प्राध्यापक सुरज माळी अन्य प्रशिक्षक व पालकांनी मुलांचे कौतुक केले पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ

    महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ  इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांपासून ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत आणि पवित्र मंदिरांपासून सांस्...