*विनायक प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न*
बीड-दि.२७ जानेवारी(बीड प्रतिनिधी)- शहरातील पेठ बीड विभागातील विनायक प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्धघाटन मा. प्राचार्य डॉ.दिपाताई क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते विद्धेची देवता सरस्वती,स्व.लोकनेत्या खासदार केशरकाकूंच्या व नानांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर, नगरसेवक विकास जोगदंड, माजी नगरसेवक अमोल पवळ,सय्यद इलियास,विनायक माध्य.मुख्याध्यापक प्रशांत पवळ सर,नवगण प्रा.शाळेचे मुख्याध्यापक देवमाने सर, रामतीर्थ प्रा.शाळेचे मुख्याध्यापक वाघ सर, सौ.भारतीताई क्षीरसागर मॅडम,गिता कन्या प्रा. शाळेचे मुख्याध्यापक अमोल पाटोळे सर,पत्रकार इम्रानजी शाह साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व शाळेच्या शैक्षणिक वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला व पालकांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कौशल्यपूर्ण,कलागुण विकसीतपूर्ण शिक्षण मिळणे महत्वाचे आहे, विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, हा उद्देश समोर ठेवून आपण शिक्षण दिले तर नक्कीच शिक्षणाचे महत्त्व लक्षात येईल असे माजी नगरसेवक शेख इलियास भाईंनी ही या स्नेहसम्मेलनाच्या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. विनायक प्राथमिक शाळा हे काकूंनी लावलेले छोटेसे रोपटे मोठ्या वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. शाळेने राबवलेल्या विविधांगी उपक्रम खुप व्यक्तिकलेला वाव देण्यासाठी महत्वपूर्ण आहेत, असे कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.दिपाताई क्षीरसागर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भावना व्यक्त करत, स्नेहसंमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक,शिक्षिका यांचे कौतुक केले.इयत्ता बालवाडी ते ४ थी पर्यंतच्या प्रत्येक वर्गातील मुला मुलींनी या स्नेहसम्मेलनामध्ये सहभागी होऊन आपल्या अंगी असणारे गुणप्रदर्शन उत्साहपूर्ण नृत्याने करून उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, विविध शैक्षणिक, सामजिक, राजकीय क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांना,पालक वर्ग यांना मंत्रमुग्ध केले.आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट असे नृत्य मूल मुली करत होती व उपस्थितांची वाहवा मिळवत होती.देशभक्ती गीत,शिवरायांची महती गीत,कव्वाली गीत, बाबासाहेब आंबेडकर महती गीत,पारंपरिक नृत्य,ग्रामीण जीवनाची गाणी,मराठी विनोदी लोकगीत,गौळण,देवदेवतांची गाणी,भारुड,कोळीगीत,शेतकरी गीत,या स्नेहसंमेलनातील गाण्यावर मूल हुभेहुब आपल्या कलेचे चित्रण करत होती.अतिशय देखने,उत्कृष्ट असे स्नेहसंमेलन विनायक प्राथमिक शाळेमध्ये संपन्न झाले.हा स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.या स्नेहसम्मेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अशोक काशीद सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार तन्वीर पठाण सरांनी मानले.
No comments:
Post a Comment