येळी गावचे पोलीस पाटील बाबूलाला पठाण

 येळी गाव हे पाथर्डी तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिध्दी आहे .या गावाची एक वेगळीच ओळख आहे शिक्षकांचे गाव म्हणून या गावाची ओळख आहे. या गावात मुस्लिम घर बोटावर मोजणे इतके आहे.म्हणजे शेख ,आत्तार ,आणि पठाण असे हे तीन घरे . पण कधीच जात पात नावाचे विष या गावात आलेच नाही या गावचे डॉ.बाबूलाला नामदार पठाण (पाटील )1961 साली या गावचे पोलीस पाटील म्हणून त्याची निवड झाली.योगा योग्य म्हणजे याच काळात गावचे सरपंच होते त्याचे वडील डॉ.नामदार बापूखा पठाण हे होते बाप लेकाने गावचा कारभाराचा गाडा उत्तम रित्या चालवला .

      या काळात गावाला प्रगतीच्या मार्गावर आणण्यासाठी गावकर्यांच्या मार्गदर्शन खाली गावात #महात्मा गांधी विद्यालय,#सोसायटी,जनावरांचा #दवाखाना,शासकीय #गोडाऊन हे आणले .डॉ बाबुलाला पाटील यांनी शक्य तो गावातील अनेक छोटे मोठे तंटे त्यांनी गाव स्थरावरच मिटवले .त्याचे कार्य हे नेहमीच उल्लेखनियी राहिले त्याच्या या कार्यबद्दल त्याचा मान सन्मान सुद्धा  झाला .जेव्हा बाबरी मस्जिद पडली तेव्हा गावचे सरपंच डॉ.दिलीप बडे हे होते . तेव्हा या गावाने एकतेचे उत्तम उदाहरण दिले गावचे सरपंच डॉ.दिलीप बडे यांनी गावाला जमा करून मस्जिदीचे उदघाटन केले. 

        प्रत्येक सण हा आनंदाने आणि एकत्र साजरे करण्याची या गावाची पद्धती होती. खालील छायाचित्र याच एकतेचे प्रतीक आहे. गावाचा सण #पोळा साजरा करतात येळी गावचे पाटील डाॅ. बाबुलाल पठाण (पाटील) आणि माजी सरपंच डाॅ.दिलीप बडे,व गावकरी मान्यवर .

सर्वसामान्य रुग्णांचे डॉ. पठाण दाम्पत्य 'देवदूत'

 


सर्वसामान्य रुग्णांचे डॉ. पठाण दाम्पत्य 'देवदूत'

ग्रामीण डॉक्टर  अनेक गावांत  केली ५० वर्षांपर्यंत रुग्णसेवा

रुग्णसेवा करून एखाद्या रुग्णांचे प्राण वाचवून सेवा करणे हे प्रत्येक डॉक्टरचे कर्तृव्य मानले जात असले तरी आजच्या काळामध्ये पैसा व प्रतिष्ठा मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक डॉक्टर आपल्याला नक्कीच दिसतात हे अनुभवांअंती सर्वांनाच माहिती आहे. मात्र ग्रामीण भागात राहून सर्वसामान्य रुग्णांनाची ५० वर्ष अतिशय कमी दरात व गावागावांत जावून सेवा करून या रुग्णांचे खऱ्या अर्थाने देवदूत ठरत असणारे पठाण दांपत्य हे कुठल्याही प्रसिद्धीस आले नाहीत हे विशेष. खेड्यामध्ये जाण्यासाठी वाहने नसताना या दाम्मत्यांनी सायकलवरून प्रवास करत मध्यरात्रीपर्यंत रुग्णांची सेवा केली. तसेच गावातील लेकींना बाळंतपणासाठी कधीही मोठ्या दवाखान्यांमध्ये जाण्याची वेळ आली नाही वा अवाढव्यही ब खर्चासळी पडण्याची गरज पडली नाही. साधा निरोप जरी या दाम्पत्यांना मिळाला तर सायकलवर अथावा कोणी मोटारसायकल घेवून आले तर मोटारसायकलवर प्रवार करून बाळंतपण पुर्ण होईपर्यंत तिथेच थांबून नॉर्मल डिलेवरी करत ते ही अत्यंत अल्पदरात. डॉ. बाबासाहब पठाण व त्यांच्या पत्नी या सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत कायमच झोकून देत असत. त्यांचा जीवनाचा प्रवास डोळ्यांमध्ये साचताना दिपून जाते त्यांचे अहोरात्र जिंव्हळणारे कष्ट खूप काही सांगून जातात. आपल्या संपूर्ण जीवनभरांच्या कार्यकाळात रात्रंदिवस लोकसेवेसाठी तत्पर असणारी त्यांची वैद्यकीय ग्रामीण भागातील लोकांसाठी असणारी सेवा खूप गुणकारी होती. आपल्या समग्र आयुष्यामध्ये त्यांच्या डॉक्टरकीच्या हाताला गुण होता अत्यंत नाममात्र शुल्का मध्ये रुग्णांची सेवा करणारा डॉक्टर रात्रीचा दिवस करून गरिबांचा वाली, आजही त्यांच्या ग्रामीण भागामध्ये लोकांच्या मना मनामध्ये घर करून बसलेला आहे.

त्यांच्या त्या काळामध्ये वाहतुकीची साधने नसल्याने डोंगर, वाड्या, गावे, पायी तर कधी सायकल वरून जात पावसाळा असो वा हिवाळा रुग्णांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असत. कित्येक वेळा त्यांनी बैलगाडीने प्रवास करून रात्रीचा दिवस करून घरच्यांचा कशाचाही विचार न करता सतत रुग्णसेवा हीच आपली ईश्वरसेवा समजून कुणी त्याचा मोबदला दिला तर ठीक तर कधी नाही दिला तरी धन्यता मानून आपली सेवा ते देत होते. रात्रीच्या वेळेस कधी रस्त्याने सायकल पंमचर झाली तरी ते थांबत नव्हते कित्येक किलोमीटर पायी चालत रुग्णांच्या सेवेसाठी पोहचत असे .कधी कधी या रात्रीच्या प्रसंगी अनेकवेळा चोरांनी त्यांना रस्त्यामध्ये अंधारात अडवले पण हे तर डॉक्टर आहेत  रुग्णाच्या तपासणीसाठी चालले आहे .कित्येक वेळा चोरांनी त्यांना घरापर्यंत व्यवस्थित पोहचवले असे आपले कार्य खूप महान होते. एखाद्या रुग्णास पैश्याची अडचण जरी असली तर ते विनामुल्य सेवा देत असे. आपल्या शांत, संयमी स्वभावाने रुग्णांच्या आयुष्यामध्ये  हास्य व प्राण फुलवणारा स्वभाव आम्हांला आजही पहायला मिळतो.

      आज आपला वाढदिवस आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आजोबा -नातू एक नाते आतुट

 आपल्या जीवनात अनेक नाते आपण निभावत असतो आणि ते नाते आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जातात .त्या नात्या मध्ये बाप-लेक ,चुलता -पुतणे,भाऊ -भाऊ ,मामा-भाचे, आजोबा- नातू हे नाते म्हणजे एक वेगळाच आनंद असतो . यातीलच एक नात म्हणजे #आजोबा #नातू .

     

काल सहज माझे वडील म्हणजेच  डॉ.बी.एन.पठाण हे नवा जवळ पास आमच्या पंचकृषित लौकीक आहे ते  माघील बऱ्याच दिवस पासून स्वतःचे  आत्मचित्रत  लिहीत आहे .एवढे संघर्ष मय जीवनाची व्यथा त्यांनी लिहिली आहे .ती वाचतांना अंगावर शहारे येतात .जीवनातील अनेक सत्य घटना त्यांनी या आत्म चरित्रातात लिहिले आहेत. प्रत्येक प्रसंग वाचताना असा तो प्रसंग डोळ्या समोर उभा राहतो.

      त्यातील एक क्षण माझ्या वाचण्यात आला आणि तो क्षण लिहिला होता आपल्या नातवावर . तो क्षण त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून एक आजोबांचे आणि नातवाचे नाते कसे असते हे लिहिला.तो शाळेत आहे तो पर्यंत घर कसे शांत  असते आणि तो आल्यावर घरात होणाऱ्या त्याच्या प्रत्येक घडामोडीचे वर्णन आणि त्याचा हट्ट कसा पूर्ण केला जातो.हे आपल्या सुंदर लेखणीच्या माध्यमातून आजोबांनी केलं आहे .त्याच नटखट नातवा बरोबरचा हा अनमोल क्षण.

सर्वसामान्य घटकाचे परिचित व्यक्तिमत्व :-सय्यद लुकमान


एक शांत संयमी व्यक्तिमत्व पारगाव सिरस गावचे खास व्यक्तिमत्व  #सय्यद #लूखमान #भाई यांचा आज 63 व्या वाढदिवस निमित्ताने त्यांचे  सामाजिक, राजकीय कार्य कौतुक करण्याजोगे आहे. स्व. #केशरकाकू क्षीरसागर, #जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेब यांचे खंबीरपणे साथ देणारे .गावांतील प्रत्येक लोकांच्या सुखदुःखात सहभागी असतात. गावांत मुस्लिम समाज कमी जरी असला तरी सर्वांना सोबत घेऊन काम करत असतात. गावांमध्ये कोणतेही कार्य असेल त्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. जाती धर्माच्या भिंतीत न राहता सर्वसमावेशक भूमिका त्यांची असते.

       सय्यद परिवारात म्हणजे 5/08/1958 आपला जन्म झाला. लहान वयापासूनच आपल्याला कुस्ती व  राजकारणा विषयी  खूप  आवड होती .राजकारणाबरोबरच समाजकार्य करणे  याचे धडे  आपल्याला  कमी वयातच आदरणीय  #स्वर्गीय  #केशरबाई #क्षीरसागर  यांच्याकडून मिळाले  आपलं नाव या पंचक्रोशी मध्ये एक पैलवान म्हणून आपण सुरुवातीला नाव लौकिक केलं नंतर 1972 साली आपण सद्गुरु सेवा ट्रस्ट सुकडी वाटप च्या संचालक म्हणून आपली निवड झाली. आपल्याला दिलेली जिम्मेदारी आपण सार्थ पणे निभावली या नंतर आपण आपल्या राजकारणी जीवनाची खरी सुरुवात केली .आपल्या हाती दिलेले काम आपण उत्तम रित्या पूर्ण करून जनसामान्यात आपली एक वेगळी ओळख आपण निर्माण केली.

     सन 1975-90 सालि पर्यंत भैरवनाथ दूध संस्थांचे सचिव म्हणून  आपण आपल्या  गावात कार्य केले. आणि तेथे पण आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण उत्तम रित्या पार पाडली. बीड जिल्ह्याच्या खासदार कै.सौ.#केसरबाई #क्षीरसागर यांचे खंदे समर्थक* म्हणून आपण आपली चांगली प्रतिमा आणि  ओळख निर्माण केली 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पाडली गेली आणि देशात एक समज दुसऱ्या समाजाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागला पण या ही ठिकाणी एक आदर्श गावची ओळख  आपल्या गावाने दाखवून दिले आणि आपल्याला 11/12/ 1992 ला बिनविरोध जात -पात न मानता आपली सरपंच पदी  निवड केली. आपण पारगाव सिरस या गावचे सरपंच पद या काळात भूषवले .

       आजही कै.सौ.#केसरबाई #क्षीरसागर काकूच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आपलं नाव या पंचक्रोशी मध्ये अग्रेसर घेतले जाते .यामध्ये कसलीही शंका नाही. या जीवनाच्या प्रवासात आपण कधी नंतर माघे वळून पाहिले नाही 1995 ते 2015 पर्यंत श्री. गजानन सूतगिरणीचे संचालक पद आपण भूषवले ,

याच काळात म्हणजे 1995 ते 2005 पर्यंत आपण कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक म्हणून आपण कार्य केले, त्याच बरोबर आपण स्वस्त धान्य दुकान जिल्हा सदस्यपदी आपली निवड झाली  आज ही आपण कार्य करत आहात आपण आपल्या या विविध क्षेत्रातुन जनकार्य केले, राजकारण ,समाज कार्य,च्या माध्यमातून आपण आपले अस्तित्व निर्माण करून  पंचक्रोशीत आपले नाव लौकिक केलं आज आपला #63 वा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आपणाला खूप खूप शुभेच्छा.

 #Happy#Birthday  दि.5/8/2020

गुरू शिष्यात कोरोना

 प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 

            सप्रेम नमस्कार. बाल मित्रांनो कसे आहात सगळे  ?.खूप दिवस झाले आपली सर्वांची पण एकत्र भेट झालीच नाही.शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते म्हणजे खुप वेगळेच असते .कारण दोघाला ही एकमेकांना शिवाय करमत नाही.

        सहज आज मागील वर्षाचे फोटो चाळत बसलो होतो. *गोकुळ अष्टमी* चे फ़ोटो पाहिले तर खरंच मन भरून आले. ज्या


*बालगोपाळां बरोबर शाळेतील प्रत्येक सण,उत्सव,मनोरंजन, खेळ, इ.आपण साजरे केले.ते आज घराच्या चार भिंतीच्या आत बसून आहेत.आज सर्व शाळा शासनाच्या नियमानुसार बंद आहेत. विदयार्थी मित्रांनो  ते पण तुमच्या हितासाठी हं!तसे पाहिले तर तुम्ही या देशाची भावी पिढी आहात . तुम्ही व तुमच्या घरच्यांचे या भयानक रोग कोरोना पासून संरक्षण व्हावे व तुमचा संपर्क कोठेही रस्त्याने किंवा शाळेत कोरोना बाधित लोकांशी येऊ नये म्हणून सर्व शाळा आज बंद आहे.  

      विदयार्थी मित्रांनो तसं पाहिले तर आज *शाळा व शिक्षक* हे पण तुमच्या शिवाय खूप अधुरे आहेत हो़ .

 *शाळा म्हणते आज मी एकटी आहे 

कारण त्याला कोरोना आहे.

चिमुकल्यांच्या किलबिलाटाने रोज मी गजबजणारी 

आज मात्र शांत आहे .

शाळेत प्रत्येक तासा तासाला आवाज देणारी शाळेची घंटा 

आज मात्र शांत आहे.

*बालगोपाळाने गच्च भरणारी शाळेची  मैदाने 

आज मात्र मोकळी मोकळी आहे. 

चिमुकल्यांच्या आवाजाने घुमणारे शाळेचे वर्ग 

आज मात्र शांत आहे* 

*शाळेतील खडू फळ्याचे जे अतुट नाते आहे ना

 आज मात्र तुटले आहे.

*ज्ञानचे धडे देणारे गुरुजन आज देश हिता साठी 

रात्र दिवस सेवा करत आहे*.

*मार्च पासून आज जून , जुलै गेला. सरला ऑगस्ट* 

*तरी पण नाही उघडली शाळा*. *आज पण आपली शाळा आणि शिक्षक एकटेच* *आहे आणि वाट तुमची पाहत आहे*.

       मागील मार्च महिन्या पासून जो कोरोनाचा रोगाचा  प्रभाव हळू हळू वाढत आहे. तो काही कमी होण्यास तयार नाही. त्यामुळे विदयार्थी मित्रांनो तुम्हाला, शिक्षकांना,आणि शाळेला हा दुरावा सहन करावा लागत आहे.तसे पाहता *शिक्षक आणि विद्यार्थी* हे नात खूप वेगळेच आहे हो जस एका गाडीचे दोन चाक.जर एक जरी चाक नसले तरी ही शिक्षणाची ज्ञानरुपी गाडी पुढे जाणार नाही हे ही तेव्हढे सत्य आहे .शिक्षक आणि विदयार्थी हे एकमेकांशिवाय जास्त वेळ दूर राहू शकत नाही. पण काय करणार विदयार्थी मित्रांनो या कोरोना रोगामुळे तब्बल 6 महिने होत आले आहे .प्रत्यक्ष शाळेपासून ,वर्गापासून, खडूफळ्या पासून तुम्ही लांब आहात. या गोष्टीची जाणीव आहे पण... काय करणार  कोरोना! . 

       आपल्यातला हा दुरावा जास्त वाढू नये आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून  नी अभ्यासक्रमाचा विसर पडू नये म्हणून *whatsapp* गृपच्या माध्यमातून  शाळेचा  अभ्यास आम्ही रोज टाकत आहोत .पण कधी कधी हे विसरतो आम्ही की माझ्या बालगोपालाचा पालक वर्ग हा *मोल मजुरी,काबाड कष्ट करणारा आहे. सकाळी काम केलं तर संध्याकाळी चूल पेटते. त्याच्या सगळ्या कडे कोठे असणार हो अँनड्रॉईड फोन*. त्यांच्याकडे साधा सुधा फोन . आणि तो पण पालकांच्या बरोबर कामावर .मग हे माझे बालगोपाल अभ्यास तरी कसे करत असतील हो !.बर ज्याच्या कडे फोन आहे त्यांना संदेश जातो पण तो पालकाकडे कामावर ..... ? ज्यांच्या कडे मोबाईल च नाही त्यांच कसं ?... हा प्रश्न नेहमी मनाला भेडसावत राहील तरी पण आपल्या कडून ज्ञान देण्यात आपण कोठे कमी पडू नये  म्हणून प्रत्यक्षात तुमची भेट घेऊन  व ध्वनी भ्रमनाच्या माध्यमातून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न  मागील काही दिवसात केला आम्ही आणि करू,हे तर तुम्हाला माहीतच आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसा पूर्वी तुम्हाला भेटण्यासाठी जेव्हा तुमच्या घरी आलो होतो.आठवते ना तुम्हाला. तेव्हाच एक गोष्ट लक्ष्यात आली की बरेच  विद्यार्थी आपल्या घरी  आपल्या छोट्या भावंडाचा सांभाळ करतांना दिसले. दिवसभर आई वडील कामावर जातात आणि हे मुलं आपल्या लहान बहीण भावांना सांभाळतात. हे दृश्य पाहून मन खूप भरून आलं हं.माझे विद्यार्थी या परिस्थिती अभ्यास तरी कसा करतील  हो ? तरी पण माझे हे छोटे छोटे विद्यार्थी या ही परिस्थितीवर मात करून अभ्यास करत आहे हे पाहून खूप बरं वाटलं.मधल्या काळात लॉक डाऊन नव्हते तेव्हा मी आणि माझ्या सहकारी मित्रांनी तुमची प्रत्यक्षात भेट घेतील तर खर एक मनाला न पटणारे हे सत्य समोर आले . पण काय करणं परिस्थिती खूप वाईट असते . म्हणून आपली परिस्थिती आपल्या वडिलांन सारखीच राहू नये त्यासाठी शिक्षण घेणे हे खूप महत्वाचे आहे मुलांनो . शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात बदल घडावा हाच उद्देश एक  शिक्षकाचा असतो म्हणून तो धडपडत असतो.म्हणून आम्ही नेहमी आमच्याकडुन जेवढे तुम्हाला देता येईल तेवढे देत राहावे हा हाच दृष्टीकोन मनी धरून आम्ही तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देत आहोत .

    विद्यार्थी मित्रांनो जीवनात अनंत अडचणी येतील पण आपण या सर्व  अडचणींवर मात करू या .ज्या प्रमाणे *कृष्णाने दुष्ट कंसाचा पराभव केला होता. त्याच प्रमाणे आपण ही या कोरोनाचा पराभव करू या* हा दृष्टिकोन समोर ठेऊन घरात बसून अभ्यास करावा. घराच्या बाहेर काम शिवाय निघू नये . हेच माझे तुम्हा सर्व विद्यार्थी सांगणे आहे. हा भयानक रोग कोरोना आज ना उद्या जरूर जाईल याची मला खात्री आहे . फक्त तुम्ही सुरक्षित घरात राहा घराच्या बाहेर निघू नका आणि जरी मोबाईल नसला तरी पुस्तकातून अभ्यास करा अडचण आल्यास मित्राच्या फोनवरून किंवा आपल्या वडिलांच्या साध्या फोनवरून आम्हाला फोन करून जी अडचण असेल ती विचारा. ज्यांच्याकडे अँनड्रॉईड मोबाईल आहे पण आपल्या बाबाकडे असतो ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्यावेळेस आपला दिलेला अभ्यास जरूर पाहावा. जिथे जिथे अडचण येईल तेथे तेथे आम्हाला म्हणजे आपल्या वर्ग शिक्षकांना फोन करा प्रत्येक अभ्यासातील आड़चणी दूर करू नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे निरसन  करू त्यात कसली शंका नाही.शेवटी एव्हढेच सांगेल हा कोरोना आज ना उद्या जाणारच आहे 

*परत नवीन पहाट होईन*

*परत शाळेची घंटा वाजेल*

*परत या शाळा उघडतील*

*परत चिमुकल्याने मैदाने भरतील*

*परत वर्ग गजबजून निघतील*

*परत शिक्षक आणि विद्यार्थी  एकत्र शाळेत भेटतील*.

*परत आपली शाळा तुमच्या मुळे फुलेल*. आशा आहे की लवकरच हा कोरोना रोग जावो व आपली शाळा लवकर उघडो. हीच इच्छा व्यक्त करतो आता रजा तुमची रजा घेतो .

    

            आपला वर्ग शिक्षक

         ✍🏻 *तनवीर पठाण*✍🏻

*विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड*

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ

    महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ  इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांपासून ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत आणि पवित्र मंदिरांपासून सांस्...