सर्वसामान्य रुग्णांचे डॉ. पठाण दाम्पत्य 'देवदूत'
ग्रामीण डॉक्टर अनेक गावांत केली ५० वर्षांपर्यंत रुग्णसेवा
रुग्णसेवा करून एखाद्या रुग्णांचे प्राण वाचवून सेवा करणे हे प्रत्येक डॉक्टरचे कर्तृव्य मानले जात असले तरी आजच्या काळामध्ये पैसा व प्रतिष्ठा मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक डॉक्टर आपल्याला नक्कीच दिसतात हे अनुभवांअंती सर्वांनाच माहिती आहे. मात्र ग्रामीण भागात राहून सर्वसामान्य रुग्णांनाची ५० वर्ष अतिशय कमी दरात व गावागावांत जावून सेवा करून या रुग्णांचे खऱ्या अर्थाने देवदूत ठरत असणारे पठाण दांपत्य हे कुठल्याही प्रसिद्धीस आले नाहीत हे विशेष. खेड्यामध्ये जाण्यासाठी वाहने नसताना या दाम्मत्यांनी सायकलवरून प्रवास करत मध्यरात्रीपर्यंत रुग्णांची सेवा केली. तसेच गावातील लेकींना बाळंतपणासाठी कधीही मोठ्या दवाखान्यांमध्ये जाण्याची वेळ आली नाही वा अवाढव्यही ब खर्चासळी पडण्याची गरज पडली नाही. साधा निरोप जरी या दाम्पत्यांना मिळाला तर सायकलवर अथावा कोणी मोटारसायकल घेवून आले तर मोटारसायकलवर प्रवार करून बाळंतपण पुर्ण होईपर्यंत तिथेच थांबून नॉर्मल डिलेवरी करत ते ही अत्यंत अल्पदरात. डॉ. बाबासाहब पठाण व त्यांच्या पत्नी या सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत कायमच झोकून देत असत. त्यांचा जीवनाचा प्रवास डोळ्यांमध्ये साचताना दिपून जाते त्यांचे अहोरात्र जिंव्हळणारे कष्ट खूप काही सांगून जातात. आपल्या संपूर्ण जीवनभरांच्या कार्यकाळात रात्रंदिवस लोकसेवेसाठी तत्पर असणारी त्यांची वैद्यकीय ग्रामीण भागातील लोकांसाठी असणारी सेवा खूप गुणकारी होती. आपल्या समग्र आयुष्यामध्ये त्यांच्या डॉक्टरकीच्या हाताला गुण होता अत्यंत नाममात्र शुल्का मध्ये रुग्णांची सेवा करणारा डॉक्टर रात्रीचा दिवस करून गरिबांचा वाली, आजही त्यांच्या ग्रामीण भागामध्ये लोकांच्या मना मनामध्ये घर करून बसलेला आहे.
त्यांच्या त्या काळामध्ये वाहतुकीची साधने नसल्याने डोंगर, वाड्या, गावे, पायी तर कधी सायकल वरून जात पावसाळा असो वा हिवाळा रुग्णांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असत. कित्येक वेळा त्यांनी बैलगाडीने प्रवास करून रात्रीचा दिवस करून घरच्यांचा कशाचाही विचार न करता सतत रुग्णसेवा हीच आपली ईश्वरसेवा समजून कुणी त्याचा मोबदला दिला तर ठीक तर कधी नाही दिला तरी धन्यता मानून आपली सेवा ते देत होते. रात्रीच्या वेळेस कधी रस्त्याने सायकल पंमचर झाली तरी ते थांबत नव्हते कित्येक किलोमीटर पायी चालत रुग्णांच्या सेवेसाठी पोहचत असे .कधी कधी या रात्रीच्या प्रसंगी अनेकवेळा चोरांनी त्यांना रस्त्यामध्ये अंधारात अडवले पण हे तर डॉक्टर आहेत रुग्णाच्या तपासणीसाठी चालले आहे .कित्येक वेळा चोरांनी त्यांना घरापर्यंत व्यवस्थित पोहचवले असे आपले कार्य खूप महान होते. एखाद्या रुग्णास पैश्याची अडचण जरी असली तर ते विनामुल्य सेवा देत असे. आपल्या शांत, संयमी स्वभावाने रुग्णांच्या आयुष्यामध्ये हास्य व प्राण फुलवणारा स्वभाव आम्हांला आजही पहायला मिळतो.
आज आपला वाढदिवस आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
No comments:
Post a Comment