गुरू शिष्यात कोरोना

 प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 

            सप्रेम नमस्कार. बाल मित्रांनो कसे आहात सगळे  ?.खूप दिवस झाले आपली सर्वांची पण एकत्र भेट झालीच नाही.शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते म्हणजे खुप वेगळेच असते .कारण दोघाला ही एकमेकांना शिवाय करमत नाही.

        सहज आज मागील वर्षाचे फोटो चाळत बसलो होतो. *गोकुळ अष्टमी* चे फ़ोटो पाहिले तर खरंच मन भरून आले. ज्या


*बालगोपाळां बरोबर शाळेतील प्रत्येक सण,उत्सव,मनोरंजन, खेळ, इ.आपण साजरे केले.ते आज घराच्या चार भिंतीच्या आत बसून आहेत.आज सर्व शाळा शासनाच्या नियमानुसार बंद आहेत. विदयार्थी मित्रांनो  ते पण तुमच्या हितासाठी हं!तसे पाहिले तर तुम्ही या देशाची भावी पिढी आहात . तुम्ही व तुमच्या घरच्यांचे या भयानक रोग कोरोना पासून संरक्षण व्हावे व तुमचा संपर्क कोठेही रस्त्याने किंवा शाळेत कोरोना बाधित लोकांशी येऊ नये म्हणून सर्व शाळा आज बंद आहे.  

      विदयार्थी मित्रांनो तसं पाहिले तर आज *शाळा व शिक्षक* हे पण तुमच्या शिवाय खूप अधुरे आहेत हो़ .

 *शाळा म्हणते आज मी एकटी आहे 

कारण त्याला कोरोना आहे.

चिमुकल्यांच्या किलबिलाटाने रोज मी गजबजणारी 

आज मात्र शांत आहे .

शाळेत प्रत्येक तासा तासाला आवाज देणारी शाळेची घंटा 

आज मात्र शांत आहे.

*बालगोपाळाने गच्च भरणारी शाळेची  मैदाने 

आज मात्र मोकळी मोकळी आहे. 

चिमुकल्यांच्या आवाजाने घुमणारे शाळेचे वर्ग 

आज मात्र शांत आहे* 

*शाळेतील खडू फळ्याचे जे अतुट नाते आहे ना

 आज मात्र तुटले आहे.

*ज्ञानचे धडे देणारे गुरुजन आज देश हिता साठी 

रात्र दिवस सेवा करत आहे*.

*मार्च पासून आज जून , जुलै गेला. सरला ऑगस्ट* 

*तरी पण नाही उघडली शाळा*. *आज पण आपली शाळा आणि शिक्षक एकटेच* *आहे आणि वाट तुमची पाहत आहे*.

       मागील मार्च महिन्या पासून जो कोरोनाचा रोगाचा  प्रभाव हळू हळू वाढत आहे. तो काही कमी होण्यास तयार नाही. त्यामुळे विदयार्थी मित्रांनो तुम्हाला, शिक्षकांना,आणि शाळेला हा दुरावा सहन करावा लागत आहे.तसे पाहता *शिक्षक आणि विद्यार्थी* हे नात खूप वेगळेच आहे हो जस एका गाडीचे दोन चाक.जर एक जरी चाक नसले तरी ही शिक्षणाची ज्ञानरुपी गाडी पुढे जाणार नाही हे ही तेव्हढे सत्य आहे .शिक्षक आणि विदयार्थी हे एकमेकांशिवाय जास्त वेळ दूर राहू शकत नाही. पण काय करणार विदयार्थी मित्रांनो या कोरोना रोगामुळे तब्बल 6 महिने होत आले आहे .प्रत्यक्ष शाळेपासून ,वर्गापासून, खडूफळ्या पासून तुम्ही लांब आहात. या गोष्टीची जाणीव आहे पण... काय करणार  कोरोना! . 

       आपल्यातला हा दुरावा जास्त वाढू नये आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून  नी अभ्यासक्रमाचा विसर पडू नये म्हणून *whatsapp* गृपच्या माध्यमातून  शाळेचा  अभ्यास आम्ही रोज टाकत आहोत .पण कधी कधी हे विसरतो आम्ही की माझ्या बालगोपालाचा पालक वर्ग हा *मोल मजुरी,काबाड कष्ट करणारा आहे. सकाळी काम केलं तर संध्याकाळी चूल पेटते. त्याच्या सगळ्या कडे कोठे असणार हो अँनड्रॉईड फोन*. त्यांच्याकडे साधा सुधा फोन . आणि तो पण पालकांच्या बरोबर कामावर .मग हे माझे बालगोपाल अभ्यास तरी कसे करत असतील हो !.बर ज्याच्या कडे फोन आहे त्यांना संदेश जातो पण तो पालकाकडे कामावर ..... ? ज्यांच्या कडे मोबाईल च नाही त्यांच कसं ?... हा प्रश्न नेहमी मनाला भेडसावत राहील तरी पण आपल्या कडून ज्ञान देण्यात आपण कोठे कमी पडू नये  म्हणून प्रत्यक्षात तुमची भेट घेऊन  व ध्वनी भ्रमनाच्या माध्यमातून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न  मागील काही दिवसात केला आम्ही आणि करू,हे तर तुम्हाला माहीतच आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसा पूर्वी तुम्हाला भेटण्यासाठी जेव्हा तुमच्या घरी आलो होतो.आठवते ना तुम्हाला. तेव्हाच एक गोष्ट लक्ष्यात आली की बरेच  विद्यार्थी आपल्या घरी  आपल्या छोट्या भावंडाचा सांभाळ करतांना दिसले. दिवसभर आई वडील कामावर जातात आणि हे मुलं आपल्या लहान बहीण भावांना सांभाळतात. हे दृश्य पाहून मन खूप भरून आलं हं.माझे विद्यार्थी या परिस्थिती अभ्यास तरी कसा करतील  हो ? तरी पण माझे हे छोटे छोटे विद्यार्थी या ही परिस्थितीवर मात करून अभ्यास करत आहे हे पाहून खूप बरं वाटलं.मधल्या काळात लॉक डाऊन नव्हते तेव्हा मी आणि माझ्या सहकारी मित्रांनी तुमची प्रत्यक्षात भेट घेतील तर खर एक मनाला न पटणारे हे सत्य समोर आले . पण काय करणं परिस्थिती खूप वाईट असते . म्हणून आपली परिस्थिती आपल्या वडिलांन सारखीच राहू नये त्यासाठी शिक्षण घेणे हे खूप महत्वाचे आहे मुलांनो . शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात बदल घडावा हाच उद्देश एक  शिक्षकाचा असतो म्हणून तो धडपडत असतो.म्हणून आम्ही नेहमी आमच्याकडुन जेवढे तुम्हाला देता येईल तेवढे देत राहावे हा हाच दृष्टीकोन मनी धरून आम्ही तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देत आहोत .

    विद्यार्थी मित्रांनो जीवनात अनंत अडचणी येतील पण आपण या सर्व  अडचणींवर मात करू या .ज्या प्रमाणे *कृष्णाने दुष्ट कंसाचा पराभव केला होता. त्याच प्रमाणे आपण ही या कोरोनाचा पराभव करू या* हा दृष्टिकोन समोर ठेऊन घरात बसून अभ्यास करावा. घराच्या बाहेर काम शिवाय निघू नये . हेच माझे तुम्हा सर्व विद्यार्थी सांगणे आहे. हा भयानक रोग कोरोना आज ना उद्या जरूर जाईल याची मला खात्री आहे . फक्त तुम्ही सुरक्षित घरात राहा घराच्या बाहेर निघू नका आणि जरी मोबाईल नसला तरी पुस्तकातून अभ्यास करा अडचण आल्यास मित्राच्या फोनवरून किंवा आपल्या वडिलांच्या साध्या फोनवरून आम्हाला फोन करून जी अडचण असेल ती विचारा. ज्यांच्याकडे अँनड्रॉईड मोबाईल आहे पण आपल्या बाबाकडे असतो ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्यावेळेस आपला दिलेला अभ्यास जरूर पाहावा. जिथे जिथे अडचण येईल तेथे तेथे आम्हाला म्हणजे आपल्या वर्ग शिक्षकांना फोन करा प्रत्येक अभ्यासातील आड़चणी दूर करू नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे निरसन  करू त्यात कसली शंका नाही.शेवटी एव्हढेच सांगेल हा कोरोना आज ना उद्या जाणारच आहे 

*परत नवीन पहाट होईन*

*परत शाळेची घंटा वाजेल*

*परत या शाळा उघडतील*

*परत चिमुकल्याने मैदाने भरतील*

*परत वर्ग गजबजून निघतील*

*परत शिक्षक आणि विद्यार्थी  एकत्र शाळेत भेटतील*.

*परत आपली शाळा तुमच्या मुळे फुलेल*. आशा आहे की लवकरच हा कोरोना रोग जावो व आपली शाळा लवकर उघडो. हीच इच्छा व्यक्त करतो आता रजा तुमची रजा घेतो .

    

            आपला वर्ग शिक्षक

         ✍🏻 *तनवीर पठाण*✍🏻

*विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड*

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ

    महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ  इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांपासून ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत आणि पवित्र मंदिरांपासून सांस्...