येळी गाव हे पाथर्डी तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिध्दी आहे .या गावाची एक वेगळीच ओळख आहे शिक्षकांचे गाव म्हणून या गावाची ओळख आहे. या गावात मुस्लिम घर बोटावर मोजणे इतके आहे.म्हणजे शेख ,आत्तार ,आणि पठाण असे हे तीन घरे . पण कधीच जात पात नावाचे विष या गावात आलेच नाही या गावचे डॉ.बाबूलाला नामदार पठाण (पाटील )1961 साली या गावचे पोलीस पाटील म्हणून त्याची निवड झाली.योगा योग्य म्हणजे याच काळात गावचे सरपंच होते त्याचे वडील डॉ.नामदार बापूखा पठाण हे होते बाप लेकाने गावचा कारभाराचा गाडा उत्तम रित्या चालवला .
या काळात गावाला प्रगतीच्या मार्गावर आणण्यासाठी गावकर्यांच्या मार्गदर्शन खाली गावात #महात्मा गांधी विद्यालय,#सोसायटी,जनावरांचा #दवाखाना,शासकीय #गोडाऊन हे आणले .डॉ बाबुलाला पाटील यांनी शक्य तो गावातील अनेक छोटे मोठे तंटे त्यांनी गाव स्थरावरच मिटवले .त्याचे कार्य हे नेहमीच उल्लेखनियी राहिले त्याच्या या कार्यबद्दल त्याचा मान सन्मान सुद्धा झाला .जेव्हा बाबरी मस्जिद पडली तेव्हा गावचे सरपंच डॉ.दिलीप बडे हे होते . तेव्हा या गावाने एकतेचे उत्तम उदाहरण दिले गावचे सरपंच डॉ.दिलीप बडे यांनी गावाला जमा करून मस्जिदीचे उदघाटन केले.
प्रत्येक सण हा आनंदाने आणि एकत्र साजरे करण्याची या गावाची पद्धती होती. खालील छायाचित्र याच एकतेचे प्रतीक आहे. गावाचा सण #पोळा साजरा करतात येळी गावचे पाटील डाॅ. बाबुलाल पठाण (पाटील) आणि माजी सरपंच डाॅ.दिलीप बडे,व गावकरी मान्यवर .
No comments:
Post a Comment