आम्ही जगण्यासाठी
आमची कला सादर करतो
आपण कोठे तरी जात असतो आणि अचानक 'ढोल, थाळी चा आवाज आपल्या कानावर पडतो.आणि आपले वेगात चालणारे पाय अचानक थांबतात आणि आपोआप त्या आवाजाकडे आपले पाय वळतात .एक छोटी मुलगी आपली कला सादर करत असते . बऱ्याच लोकांच्या लक्षत आले असेल मी कोणाच्या संदर्भात बोलत आहे ते.होय मी बोलत आहे डोंबारी समाजाच्या बाबतीत.
हा समाज आपली आणि आपल्या कुटूंबातील सदस्यांची पोटाची खळगी भरवण्यासाठी आपली कला रस्त्यावर सादर करून आपला उदर निर्वाह करत आहे . हे कलाकार आपल्याला अनेक वेळा रस्त्यावर ,चौकात, दिसले असतील.खरच या कलेची कदर करा. मित्रांनो आज ही कला लुप्त होत चालली आहे . ही खूप मोठी बाब आहे .म्हणून हे कलाकार आपल्या कलेची कदर म्हणून सार्वजनिक ठिकाणी आपली कला सादर करून लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या पैशांवर आपला उदरनिर्वाह करतात.
वास्तविक पाहता हा समाज पिढ्यान्पिढ्या हे काम करीत आल्याचे आपल्याला दिसते .या गतिमान युगात ही कला संपत चालली आहे. लोककला आज आधुनिक काळात नष्ट होत चालली आहे. या आधुनिक काळात सामान्यपणे ही कला जपणे आणि या कलेची कदर करणे हे आपले कर्तव्य आहे.
✍🏻तनवीर पठाण सर
बीड
📸 महावीर
No comments:
Post a Comment