लोकनेते
ग्रामपंचयत निकालाच्या माध्यमातून आज परत सिद्ध झाले की . एक कुशल नेतृत्व व संयमी राजकारणी पराजय झालं म्हणून न खचता परत त्याच उमीदेणे जनतेची सेवा करणे. त्यांच्या आडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी तत्पर रहाणारे असे लोकनेते #माजी_मंत्री_श्री_जयदत्त_आण्णा_क्षीरसागर* .
राजुरी(न.) गावात जन्मलेले एक अतुलनीय व्यक्तीमत्व आपल्या कार्यामुळे जनतेच्या अविरतपणे असणाऱ्या प्रेमामुळे एक उमलत नेतृत्व अविरत उभे आहे.. बीड जिल्ह्यातील एक थोरले घर म्हणून या घराकडे पाहिले जाते... राजकारणाचे अनेक अष्टपैलू बाळकडू स्व.#लोकनेत्या_केशरकाकू_क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील लोकांच्या मना मनातील हृदयात पोहचलेल एक असामान्य व्यक्तिमत्व अविरतपणे विकास हाच ध्यास, विकास हाच धर्म, विकास हीच जात समजून सर्व समाजातील, धर्मातील लोकांना बरोबर घेऊन काम करत आहे... आज पर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगाराची व नोकरीची संधी उपलब्ध करणारे जयदत्त आण्णा क्षीरसागर एक आजातपुरुष आहे... , गजानन सूतगिरणी, गजानन सहकारी बँक बीड बाजार समिती, बीड दूध संघ, पं. स.,जि. प. यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातील आपल्या कौशल्याची ओळख करून देतात... निवडणुकीपूरते राजकारण व नंतर फक्त समाजकारण व विकास यासाठी ते सत्तेत असो किंवा नसो त्यांना मानाचे स्थान असते... #स्व_गोपीनाथ_मुंडे यांच्या नंतर आज बघितले तर आण्णासाहेबाकडे पाहावे लागेल.. आजही त्यांच्या नावाचा दबदबा, रुबाब कायम आहे.. अनेक मातब्बर नेते आज आण्णांच्या विचारांना मानतात, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन नेहमीच महत्वाचे असते.. लाखो लोकांच्या प्रत्येक सुख दुःखात आण्णा सदैव बरोबर असतात..
हजारो लोकांच्या हाताला काम देणारा, हजारो लोकांच्या घरात उद्योगधंदे निर्माण करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवनवीन संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध संधीचे सोने करणारे जयदत्त आण्णा यांचे निपुण भविष्यातील वेध घेणारे ध्येय साध्य करणारे ठरतात...आजच्या या परिस्थिती मध्ये आपल्या उत्कृष्ट नियोजन असल्यामुळे भल्या भल्या
राजकारणातील रथी, महारथीनां आपल्या शांत व संयमी दूरदृष्टीने, चाणाक्ष पद्धतीने आपलेसे करणारे नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर आज जिल्ह्यातील धुरंधर लोकनेते आहेत... समाजातील वंचित ,उपेक्षीत लोकांच्या बरोबर असणारे, कार्यकर्त्याला बळ देणारे बीड जिल्ह्यातील लोकांच्याहृदयात आहेत... #वादळे_येतात_आणि_जातात.हे ही चार वर्षे निघून जातील .पराभवाने न खचणारे हे एक कुशल नेतृत्व आहे. आपल्या विकासाच्या ध्यासाचा वसा न सोडता आज ते मार्गक्रमण करत आहेत... संघर्ष, शक्ती, व संघटन कौशल्य आत्मसात असणारे आण्णा हे धुरंधर योद्धे आहेत...आपल्या बीड तालुका ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील प्रमुख असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावांची तोंडपाठ ओळख असणारे व्यक्तिमत्व किती विलक्षण आहे हे दिसून येते... जुन्या व नवीन कार्यकर्त्यांची सांगड घालून ग्रामपंचयत मध्ये 29 पैकी 21ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विधान सभेला पडलेले खड्डे हे लोकांनी या माध्यमातून भरून काढले हे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही .तस पाहिले तर विकासाचा हा महापुरुष आज ग्रामीण जीवनात बदल घडवणारा अभियंता अनुभवी नेता ठरत आहे... आपली जनमानसातील स्वच्छ प्रतिमा, शांत व संयमी स्वभावाने ते नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतात.. बीड जिल्ह्यातील विकासासाठी आपल्या कल्पक दूरदृष्टीने मोठं मोठे प्रकल्प हाती घेऊन जनतेच्या सेवेसाठी सदैव ते प्रयत्नशील असतात...
*क्षेत्र कोणतेही असो आम्ही विकासासाठी सदैव पुढे राहू* ही भूमिका ठेवून त्यांची विकासाची गंगा वाहत असते... आजही क्षीरसागर कुटुंब सदैव 24 तास जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी खूप काही प्रेरणा देतो..
विकासाची ही गंगा नेहमी वाहत ठेवू, आपल्या अथक, कल्पक दूरदृष्टी असणारे लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे कार्य खूप मोठे आहे.. स्व.काकू नाना क्षीरसागर यांचा सक्षमपणे वारसा ते चालवणारे विकासाचे महामेरू आहेत . त्यांच्या कामाचे मूल्यांकन शब्दात वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील...
✍🏻तनवीर पठाण ✍🏻
काझीनगर बीड
No comments:
Post a Comment