धर्माच्या पलिकडील नाते
जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे असे आपण मानतो .पण खरंच असं आपण वागतो का ? असा खूप मोठा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.परंतु खरच काही असो काही लोकं जे कार्य करतात ते कार्य जीवनभर विसरण्यासारखा नसते . आज अशीच एक घटना मी आपल्यासमोर या छोट्याशा लेखाच्या माध्यमातून सादर करत आहे. मी काही दिवसापूर्वी एक छोटासा लेख माझ्या फेसबुक अकाउंट वरून शेअर केला होता. त्या फेसबुक पोस्टवर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया म्हणजे आमच्या कुटूंब विषय असलेले आपले प्रेम .मी फेसबुक वर एक पोस्ट पाहिली मनाला खूप सुखद आनंद मिळाला .बोधेगाव येथील एक मुस्लिम युवकाने म्हणजे बाबा पठाण यांनी आपल्या हिंदू बहिणीचे केलेलं लग्न आणि निभावले मामाचे कर्तव्ये हे त्यांचे कार्य हे खरंच स्तुती करण्यासारखे आहे आणि ते केलं पाहिजे. असे माणसं क्वचितच असतात. खरंच मी त्यांचे अभिनंदन करेन.
मित्रांनो कदाचित आपल्याला ही गोष्ट माहीत नसेल. परंतु हे येळी गावाचे मुस्लिम घर म्हणजे नामदार पठाण याचे घर आणि या घराती डॉक्टर बाबूलाल पठाण पाटील यांनी 1975 च्या काळात आपल्याच गावातील श्री.गजाबा फुंदे हे नाव कदाचित तुम्ही ऐकून असाल. श्री.गजाबा फुंदे हे सुरुवातीला सैन्य दलात कार्यरत होते.लढाई चालू असताना अचानक बंदुकीच्या पाठीमागचा भाग त्यांच्या नाकावर लागला. त्यामुळे ते जखमी झाले आणि या कारणामुळे त्यांना सैन्यदलाची नोकरी सोडावी लागली. ते गावाकडे आले. गावाकडे आल्यानंतर त्यांनी पोस्टमन म्हणून आपली सेवा सुरू केली . पत्नी पारूबाई यांच्याबरोबर गावातील बुरुजावर राहत असे. पारूबाई यांना सख्खा भाऊ नसल्यामुळे त्यांनी गुरूभाऊ म्हणून बाबूलाल पठाण पाटील यांना दर वर्षी राखी बांधत असे . बाबुलाल पाटील हे मुस्लिम आणि पारुबाई ह्या हिंदू परंतु कधीच बहीण भावाच्या नात्या मध्ये धर्म व जात येऊ दिली नाही . पारुबाई दर दिवाळीच्या भाऊबिजेला जेवण करण्यासाठी बाबूलाला पाटलाच्या पूर्ण घराला जेवणाचे आमंत्रण देत असे . पारुबाई तश्या खूप प्रेमळ आणि शांत स्वभावाचे होत्या श्री गजाबा फुंदे- पारूबाई या दाम्पत्यांना एक एक मुलगी होती शांता. शांता ही आपल्या स्वभावा सारखी शांतच तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण येळी गावात झाले. दहावी झाल्यानंतर आई-वडिलांनी तिच्यासाठी एक स्थळ पाहिले. हे स्थळ गेवराई तालुक्यातील वडगाव येथील श्री भाऊसाहेब भाबड ग्रामसेवक हे होते.
सर्व योग जुळून आले आणि लग्नाची सुपारी फोडण्यासाठी सर्व जमा झाले. तेवढ्यात पारूबाई यांनी तिथे एका गोष्टीचा हट्ट धरला की माझ्या मुलीचं लग्न तिच्या मामाच्या दारातच होणार म्हणजेच बाबूलाल पाटील यांच्या दारामध्ये कराचे असा आग्रह धारला. मित्रानो आज आपण किती छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो हो .पण त्याकाळी अशी काही सामाजिक बांधिलकी होती की त्याचा विचारच आपण करू शकत नाही .बहिण-भावाचे नाते हे आपल्याला विसरून चालणार नाही पाटलाच्या दारासमोर जो मंडप दिला त्या मंडपाचा खर्च व स्पीकर चा खर्च स्वतः पाटलाने केला . लग्नाचा मुहूर्त आला नवरी नवरीच्या माघे मामा म्हणून कोण उभा राहणार कारण पारुबाई यांना भाऊ नव्हता आणि त्याचा वेळे मामाचे कर्तृत्व मुस्लिम गुरू भाऊ बाबूंलाल पठाण पाटलांनी निभावली आणि लग्न खूप थाटामाटात पार पडले या लग्नात नवरी च्या पाठीमागे मामा म्हणून उभा राहण्याचा जो मान डॉक्टर बाबूलाल पाटील यांनी निभावला तो खर्च स्तुती करण्या सारखा आहे .आज काल सखा मामा हि करू शकणार नाही असे कार्य त्यांनी त्या काळी केले . कदाचित आपल्या गावातील जुन्या लोकांना हे माहित असेल परंतु नव्या पिढीला माहीत होणे हे ही गरजेचे आहे . मुस्लिम कुटूंबातील डॉक्टर बाबूलाल पाटलासारखा माणूस खरंच कदाचितच होणे नाही. आज बोधेगाव येथील बाबा पठाण यांनी केलेल्या कार्याचे कौतुक सर्व जन करत आहोत. पण हे असंच कार्य बाबूलाल पाटलांनी यांनी 70 च्या दशकात केले म्हणजे त्याकाळात केलं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रानो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच बाबूलाल पाटलासारखे माणूस हे येळी गावचे होते याचा सार्थ अभिमान आहे. ही पोस्ट टाकण्या मागचा उद्देश हाच की त्यांच्या कार्याची ओळख त्या काळामध्ये सोशल मीडिया नसल्यामुळे होऊ शकली नाही. पण आज त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न मी करत आहे. ही पोस्ट आवडली तर नक्की शेअर करा
No comments:
Post a Comment