शाळा
आज मी एकटी आहे
कारण त्याला कोरोना आहे ||धृ||
चिमुकल्यांच्या किलबिलाटाने रोज मी
गजबजणारी आज मात्र शांत आहे
आज मी एकटी आहे
कारण त्याला कोरोना आहे||१||
तासा तासाला आवाज देणारी घंटा
आज मात्र शांत आहे
आज मी एकटी आहे
कारण त्याला कोरोना आहे||२||
चिमुकल्यांने गच्च भरणारी मैदाने
आज मात्र रिकामी आहे
आज मी एकटी आहे
कारण त्याला कोरोना आहे ||३||
चिमुकल्यांच्या आवाजाने घुमणारे वर्ग
आज मात्र शांत आहे
आज मी एकटी आहे
कारण त्याला कोरोना आहे ||४||
खडू फळ्याचे आतुट नाते
आज मात्र तुटले आहे
आज मी एकटी आहे
कारण त्याला कोरोना आहे ||५||
ज्ञानचे धडे देणारे गुरुजन
आज मात्र घरातच बसून आहेत
आज मी एकटी आहे
कारण त्याला कोरोना आहे ||६||
जून जुलै गेला सरला ऑगस्ट
तरी पण नाही उघडल्या शाळा
आज पण एकटीआहे
कारण त्याला कोरोना आहे ||७||
✍🏻 तनवीर पठाण ✍🏻
काझीनगर बीड
No comments:
Post a Comment