डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर ध्यास विकासाचा

 Attention to developmen
       ध्यास विकासाचा


 महाराष्ट्रासह संपुर्ण देशात सध्या युवा पुढार्यांचा बोलबाला पहायला मिळत आहे. यामध्ये आपला बीड जिल्हाही मागे नाही. काही अपवाद वगळता असतील पण. अन् जेथे अपवाद आहे. तेथील जणताही बोलायला घाबरत नाही.आणि चांगले कार्य करणाऱ्याचे कौतुक करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे .नेमका तसाच काहीसा प्रकार बीड शहरात पहायला मिळाला.म्हणतातना नेते झाले म्हणजे फक्त Ac गाडीतून फिरायचं आणि लोकांनी नमस्कार घातला तर काच न खाली करता आपल्या गाडीतून नमस्कार करणारे नेते आपण आपल्या महाराष्ट्रात खूप पाहिले असतील. 

      काही नेते असे पण आहेत आपल्या महाराष्ट्रात  की  ते जनतेच्या समस्या जाणुनी घेण्यासाठी  जनता दरबार  बोलून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात .पण कधी असा नेता पाहिला का जो जनतेच्या आडीअडचणी  थेट जनते मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन  त्या जिथल्या तेथे सोडवण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न करतात. नाही ना ...! तुम्हाला *नायक*  चित्रपट  आठवत असेल. त्यामध्ये  अनिल कपूर जनतेच्या  सर्व अडचनी सोडवण्यासाठी आपल्या बरोबर सर्व शासकीय ताफा घेऊ त्यांच्या अडचणी जिथल्या  तेथे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो . 

     अगदी मागील काही वर्ष पासून आपल्या बीड शहरात हेच घडत आहे.जनतेच्या मनात काय चालले हे प्रत्येक्ष त्याच्यात जाऊन त्याच्या अडचणी तात्काळ दूर करणारे प्रयत्न आपल्या शहरात होत आहे हे सर्व करत आहे आपल्या बीडचे तरुणाचे  तरुण, तडपदार, निर्णयक्षम,एक उच्चशिक्षित ,स्वच्छ प्रतिमा असणारे  नेते ,डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर हो मी त्याच्याच बाबतीत बोलत आहे. 



    आजी (केशरकाकू )पासून , तसेच मोठ्या काका व वडिलांना पासून राजकारणाचे धडे मिळाले हे तितकेच खरे आपला व्यवसाय सांभाळून ते मा.आण्णा साहेब, व अध्यक्ष साहेब यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा  आज खूप प्रमाणिकपणे  पुढे चालवत आहेत .अस म्हणता ना हिरेकी पारख जोहरी जाणे त्याच पद्धतीने मा.आण्णा साहेबांनी बीड शहरातील व तालुक्यातील युवकाची धुरा डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या हाती दिली आहे.  आज ते 100% योग्य ठरली आहे .ते पूर्ण पणे योगदान देत आहेत व देत राहतील यात कसली कणभरभी शंका नाही.

      तस पाहिलं तर तनवीर सारख व्यक्ती आपल्या प्रभागातील अडचणी घेऊन जातो  कसला ही विलंभ न करता  त्या निस्वार्थ पणे मार्गी लावतात.म्हणतात ना कर्म करो फल की चिंता मत करो  हेच कार्य आपल्या हाती भैय्या साहेबांनी घेतले  आहे . सर्वसामान्य जनतेच्या अडचणी काय असतात हो ❓ रस्ता, नाली , विज , पाणी, हे या मुलभूत गरजा *(Basic thunder)* व्यतिरिक्त दुसरे काय असते.याच अडचणी त्याच्यात जाऊन सोडवणं यालाच तर खरा सर्वसामाण्य जनतेच नेता म्हणतात.  काही काम वेळेवर मार्गी लागतात तर काही वेळ लागतो त्या साठी आपण ही वाट पाहावी लागते.

      खरंच जर या पुढार्यांना वेळ मिळाला तर सर्वसामाण्यांना आड़चन राहणारच नाही अन् सध्या बीड शहरात जेथे आड़चन येते तेथे जनता बिनधास्त पणे आपल्या अडचणींचा डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या कोर्टात टाकतात मग काय *on-the-spot action* यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे .एक नवीन पर्व सुरु झाले आहे. हे म्हणणे वावगे ठरणार नाही .  जे कार्य *मा. अण्णासाहेब व अध्यक्षसाहेबांच्या* नेतृत्वाखाली डॉ. योगेश भैय्या करू शकतात हे मात्र तेव्हढेच खरे...



                          ✍🏻 पठाण तनवीर सर✍🏻

                                 काझीनगर बीड

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ

    महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ  इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांपासून ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत आणि पवित्र मंदिरांपासून सांस्...