माणुसकी
माणुसकी या शब्दात खूप काही दडले आहे .ज्याला हे कळले त्यांनी माणुसकी जपली. असाच एक अनुभव काल आम्हाला आला .आज #कोरोना (covid 19) मुळे जग परेशान झालं आहे. कित्येक प्रपंच रस्त्यावर आले आहे. कित्येक कुटुंबामध्ये खाण्यासाठी दाणे नाही. असे कुटूंब रस्त्यावर आले आहेत. हे आपल्यालाही माहित आहे. परंतु काही अशी लोक आहेत. कि ती रोज काहीतरी कोणाच्या तरी दान धर्माने आपले पोट भरत असतात .असाच एक अनुभव जो काळजाला भिडणारा होता तो मला आला.काल फिरण्यासाठी आम्ही कपिलधार इथे गेलो होतो. निसर्गाच्या सानिध्या आणि त्यात श्रावण महिना परिसर कसा सुखमय व रमणीय झाला होता. कपिलधार च्या या निसर्ग मय वातावरणात बराच वेळ घालवल्यानंतर परत बीड कडे निघालो. कपिलधार चा रस्ता संपला आणि आता लागला होता तो महामार्ग . महामार्गा लागल्यानंतर एक वयोवृद्ध व्यक्ती हातात विना, एक पोत्याचे गाठोडे ,फाटलेला बूट, डोळ्यावर काळा चष्मा ,अंगावर काळ्या रंगाचे फाटलेले जरकीन कदाचित कोणी दिले असेल,आतून मळकट कपडे,पायाला प्लास्टिक गुंडाळलेले.आशा अवस्थेत ते रोडच्या कडेला काहीतरी आपल्या पिशवीत शोधत होते ही गोष्ट मी गाडीतून पाहिली आणि लगेच गाडी बाजूला लावली बाजूला लावल्यानंतर त्या वयोवृद्ध व्यक्तीकडे गेलोत आणि विचारलं जेवण केलं का हो बाबा त्या वृद्ध व्यक्तीने तोंडाने न बोलत हात हलवत जेवण नाही केलं असं सांगितलं. गाडीमध्ये आमच्याकडे काही जेवण शिल्लक होते ते जेवण त्या वयोवृद्ध बाबांना दिले चेहऱ्यावर आनंदाश्रू आणि आशीर्वादासाठी वरती झालेले हात कदाचित आमच्याकडे काहीतरी मदतीची अपेक्षा करत असेल असे वाटू लागले. त्या बाबांना विचारलं आता कुठे जायचं ते म्हणाले जिकडे वाट सापडेल तिकडे ?अस म्हटल्या नंतर आम्ही काही पैसे मदत म्हणून दिली आणि सांगितली की जपून ठेवा भूक लागल्यावर काहीतरी घेऊन खा. तेव्हा लगेच त्या बाबांनी विणा हातात घेऊन काहीतरी म्हणून दाखवावे म्ह्णून गुणगुणायला लागले हे सगळं पाहून मन भरून आलं परिस्थिती खूप वाईट असते शेवटी #माणुसकीच्या नात्याने आपणही काहीतरी या समाजाचे देणे लागतो या दृष्टिकोनातून त्यांना स्वतःच जवळ असलेला डबा देणे,त्यांची विचार पुसना करणे ही एक माणुसकीच .नंतर बीडला आमचा परतीचा प्रवास सुरू केले. जीवन खूप अवघड असतं जोपर्यंत माणसाकडे माणुसकी आहे तो पर्यंत कोणी ना कोणी कोणासाठी कोणत्या ना कोणत्या मार्गाने तरी मदतीला धावून येणारच . म्हणून जिथे कुठे असे वयोवृद्ध लोक दिसतील तेव्हा त्यांची मदत करा. या मदतीचा माध्यमातून आपणही ही थोडीफार माणुसकी दाखवू या .
तनवीर सर पठाण
काझीनगर बीड
No comments:
Post a Comment