अरविंद जगताप :- वृक्षप्रेमी आणि लेखक

 वृक्षप्रेमी आणि लेखक :अरविंद जगताप

    आपले थोडे नाव झाले की आपल्या मातीशी बऱ्याच लोकांची नाळ तुटते. पण असे काही लोक असतात की  त्याची नाळ ही आपल्या मातीशी, तळागाळातील लोकांशी जोडलेले असते. असे लोक बोटावर मोजणे इतकेच असतात त्यातील आपण एक.

     बीडच्या भूमीचे भूमिपुत्र आहात या गोष्टीचा खूप  अभिमान वाटतो आपला जन्म *पाडळसिंगी* येथे झाला. मा. *प्रसिद्ध  मराठी लेखक अरविंद कौशल्या  गणपतराव जगताप*  आपल्या ग्रामीण लोकजीवनाचा प्रभाव आपल्यावरती पडला  आहे . हेच आपण आपल्या लेखनातून वाचकांना दाखवून दिला आहे अरविंद दादा  .

   आज ग्रामीण जीवन आणि ग्रामीण जीवनात घडणाऱ्या रोजच्या घटना त्यात गावातील राजकारण असो  गावातल्या पारावरील  गप्पा गोष्टी असो, गावांमध्ये घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असो , माझा शेतकरीबांधव असो .अश्या बारीक बारी गोष्टीचा सखोल अभ्यास करून ते लेखनाचा माध्यमातून सर्व सामान्य पर्यंत आपण मांडले.शेतकऱ्याची आत्महात्या असो, वृक्ष लागवड असो, किंवा वृक्ष तोड असो, यावरती लिहिणारे  आपले लेख व पत्र काळजाचे ठोके चुकवतात आणि पाषाणा सारखाय असणाऱ्या काळजातून तुम्ही आपल्या लेखणीतून अश्रू काढतात. आपल्या लेखनातून आलेली  *गोष्ट छोटी डोंगरा ऐवढी*  हा चित्रपट शेतकरी आत्महात्या का करतो. हे अख्ख्या महाराष्ट्रानी पाहिलं ते आपण खूप सूंदर रित्या मांडले . शेतकरी आत्महात्याचे प्रमाण का वाढत आहे .हे आपण या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडले.

      *चला हवा येऊ द्या*  या शो मधील आपले पत्र ज्या वेळेस वाचले जात असते ना तेव्हा शो मध्ये आलेल्या प्रत्येक  पाहुण्याच्या आपले पत्र वाचन चालू आसतांना  आणि ऐकताना त्यांच्या डोळ्यातुन पाणी येते. आपले प्रत्येक पत्र मी वाचले पण आणि पाहिले पण आईसंदर्भातील पत्र  असो ,बाबा संदर्भातील आपले पत्र असो , पोलीस दादा संदर्भातील आपले  पत्र असो  मुलीच्या लग्न साठी बापाची तळमळी चे पत्र असो इ. या पत्राचे वाचन चालू असताना  प्रेक्षकांच्या डोळ्यातून तुम्ही पाणी उतरवलं . खरंच आपल्याविषयी लिहीत असताना  माझ्यासारख्या  शिक्षकाला आपल्या सारख्या महान लेखका विषय  खूप अभिमान वाटतो. वाटणार का नाही .

      राजकारनाचा  उत्तम गोंधळ पण आपण *गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा* या चित्रपटाच्या माध्यमातून खूप सुंदर रित्या मांडले आहे. अस म्हणताना ना माणसाच्या जो पर्यंत आपण जवळ जात नाही तो पर्यंत त्याचा स्वभाव आपल्याला कळत नसतो. आपल्याला जवळून आणि आपल्या बरोबर विचारांची देवाण घेवाण करण्याचा योग्य आमचे मित्र *अनिल धायगुडे* याच्यामुळे मला सह्याद्री देवराईच्या निमित्ताने आला .इतर जिह्यातील असणारे पर्यटन स्थळ या सारखे आपल्या ही जिल्ह्यत एखादे  स्थळ असावे.हा दुरदृष्टिकोन ठेऊन आपण आणि सयाजी शिंदे सर यांनी  हातात  घेतलेला उपक्रम *सह्याद्री देवराई* हा खरच खूपच चर्चेत राहिला. देशी झाडाविषयीचे  महत्व आपण या प्रकल्पाच्या  माध्यमातून बीडकराणा समजून दिला  आणि आमच्या सारख्या अनेक वृक्ष प्रेमीना आपण जवळ  केले .गेल्या अनेक वर्षापासून आपण बीड मध्ये  *सहयाद्री देवराई* साठी  प्रयत्न करत आहात . या वर्षी 2020 मध्ये आपण जे *पहिले वृक्ष संमेलन* बीड मध्ये घेतले ते खरंच शब्दात किंवा लेखनात सांगता येणार नाही. एवढा मोठे पहिले वृक्ष संमेलन ते ही बीड सारख्या ऊसतोड मजुरांचा जिल्ह्य म्हणून ओळख असणाऱ्या दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या बीड येथील *पालवन* येथे  घेऊन जगात  बीड चे नाव लौकिक केलं. 

      या सह्याद्री देवराईच्या माध्यमाने मी आपल्या संपर्कात आलो हे ही तितकेच खरे  एक लेखक म्हटल्यानंतर किंवा एक अभिनेता म्हटल्यानंतर त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा वेगळाच असतो. तुमच्याविषयी हे वेगळेच आहे.  कोणत्या गोष्टीचा आपणास अभिमान नाही हे मला त्या दिवशी कळले   आपण  आमच्या बरोबर जमिनीवर बसून जेवण केले ते ही खाली काही न टाकता.  त्या वेळेस मला कळले की  सर्वसामान्य सारखे आपले व्यक्तीमत्व आहे . खरंच कळलं आपला स्वभाव आपले वागणे एकदम शांत होते. दादा आपल्या सारखा माणूस आहे तो पण या बीड जिल्ह्याचा भूमीपुत्र याच गोष्टीचा खूप अभिमान वाटतो.

आज आपला वाढदिवस आहे कदाचित हा संदेश आपल्या पर्यंत पोहोचेल किंवा नाही हे सांगता येत नाही दादा आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐


              💐शुभेच्छुक💐

                तनवीर  पठाण

                 सह शिक्षक

    विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड




No comments:

Post a Comment

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ

    महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ  इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांपासून ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत आणि पवित्र मंदिरांपासून सांस्...