एक आठवण
लेख क्र.08 दि.26/05/2021
सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असा आपला महाराष्ट्र आहे. ग्रामीण भागातून आजही विविध कला जोपासल्या जात आहेत. गावांच्या यात्रा उत्सवामधून होणारे तमाशा, लोकनाट्य, बहुरूपी , डोंबाऱ्याचे खेळ,पोवाडा, जागरण गोंधळ कलगीतुरा , वासुदेव , इ .हे आज ही खूप प्रसिद्ध आहे .
आज सकाळी पेपर मध्ये एक बातमी आली की वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन झाल्याची. लोककलेतील एक चांगली कलाकार आज काळाच्या पडद्याआड झाली .एका काळात आपल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी स्त्री असून पुरुषाची भूमिका साकारणारी आपल्या कलेने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या एक उमदा कलाकार होत्या.
आपल्या गावामध्ये यात्रेला नेहमी वेगवेगळे तमाशे येत असे. म्हणजे त्यावेळी त्यांना येण्यासाठी सुपारी दिली जाई . त्यांचा गावा तर्फे मानसन्मान केला जाई तेव्हा ,दत्तोबा तांबे, दत्ता महाडिक ,पांडुरंग मुळे सह गुलाबरावबोरगावकर ,चंद्रकांत ढवळपुरीकर ,कांताबाई सातारकर सह तुकाराम खेडकर, आपल्या येळी गावावरून नेहमी विठाबाई नारायणगावकर, कळू बाळू यांचे जाणे येणे असत.
कांताबाई सातारकर सह तुकाराम खेडकर यांचा तमाशा नेहमी आपल्या परिसरात येत असे. तेव्हा आपल्या पंचकृषित गावातील श्री. दत्त नाटक मंडळाचे चांगलेच नाव झालेले होते .या नाटक मंडळाचा व कलाकारांचा स्वतः वै. ह. भ. प. भगवान बाबांनी गुणगौरव केला होता . भगवानगड, परिसरात खूप नाव येळीच्या बाबूलाल पाटील यांच्या श्री. दत्त नाटक मंडळाने कमवले होते .
मिडसांगवी यात्रेतील प्रयोग करून कांताबाई सातारकर सह तुकाराम खेडकर तमाशा मंडळाचे कलाकार व ते स्वतः परतीचा प्रवास करत असतांना येळी गावा जवळ आले असता त्यांची एक गाडी खराब झाली. गाडी दुरुस्त होई पर्यंत आपण जेवण करू असे त्यांचे नियोजन ठरले .त्या साठी झाडाखाली राहुटी देण्याचे काम चालू होते . तेव्हा तेथून रस्त्याने जात असणारे बाबूलाल पाटील यांनी ते पहिले आणि लगेच त्याच्या जवळ गेले .पाटलाने त्यांची विचार पूस केली तेव्हा गाडी खराब झाली म्हणून थांबलो असे ते म्हणाले . पाटलांनी त्यांची स्वयंपाक करण्याची गडबड पाहिली तेव्हा ते म्हणाले मी येळीचा पोलीस पाटील आहे .असे म्हणताच कांताबाई सातारकर यांनी लगेच त्यांना ओळखले तुम्ही बाबूलाल पाटील ना...! लगेच त्यांनी त्यांना नमस्कार घातला .बाबूलाल पाटलांचे नाव ते पाटील म्हणून नव्हे तर श्री दत्त नाटक मंडळाचे मालक म्हणुन त्या ओळखत असत .बाबूलाल पाटील त्यांना म्हणाले तुम्ही आमच्या गावात आज पाहुणे आहात .तुमची गाडी आमच्या गावात खराब झाली आहे .ती दुरुस्त होई पर्यंत तुम्ही आमच्या घरी जेवण साठी चला .तुम्ही स्वयंपक करू नका आज येळीकरांचा पाहुणचार घ्या . सर्वांनी जेवण करण्यासाठी आमच्या घरी यायचे असे पाटलांनी त्यांना सांगून जेवणाचे निमंत्रण दिले. सर्व तमाशा मंडळातील लोक पाटलांच्या घरी जेवणासाठी आले . चटकदार जेवणाचा आस्वाद घेतला पाटलांनी त्याचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला . कांताबाई सातारकर जाता जाता पाटलांना म्हणाल्या मी तुमच्या येळी गावाचे नाव खूप ऐकून होते. तुम्ही कलाकारांचा खूप मान सन्मान करतात. आज ते मी माझ्या डोळ्याने पाहिले व स्वतः ते अनुभवले. माणुसकी हा एक धर्म आहे त्यावेळेस बाबूलाल पाटील यांनी तो निभावला .
कांताबाई सातारकर सह तुकाराम खेडकर तमाशा मंडळ हे येळी यात्रेसाठी येत असत त्या त्या वेळी ते आवर्जून डॉक्टर बाबूलाल पाटील यांची भेट घेत .आमच्या गावाच्या यात्रेसाठी येऊन यात्रेची शोभा वाढवली म्हणून डॉ. बाबुलाल पाटील गावकरी यांच्या वतीने मानपान देऊन सन्मानित करीत असत.कांताबाई सातारकर या तमाशा कलावंत आणि डॉक्टर बाबुलाल पाटील हे नाट्य कलावंत हे वैचारिक साम्य असल्यामुळे त्यांच्यात वेळोवेळी चर्चा होत असे .एकदा स्नेह भोजनासाठी कांताबाई सातारकर या बाबूलाल पाटील यांच्या घरी आले असता त्यांना माहित होते बाबुलाल पाटील हे सर्व गुण संपन्न कलाकार आहेत त्यामुळे त्यांनी बाबूलाल पाटील यांच्या घरातील सर्व मंडळी समोर विचारणा केली की पाटील तुम्ही आमच्या मंडळात काम कराल का ? यावर पाटील म्हणाले मी मराठी चित्रपटात काम करण्यासाठी कोल्हापूरला गेलो होतो. परंतु माझे वडील व त्याचे मित्र श्री विश्वनाथ कराड गुरुजी यांनी मला चित्रपटात काम करू न देता पाठीमागे आणले .मी त्यांच्या शब्दाच्या पुढे नाही .आता तर गावाच्या पाटीलकीची व घरची जबाबदारी माझ्यावर आहे मला ते शक्य नाही.....!
या लेखाच्या माध्यमातून कांताबाई सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
तनवीर पठाण सर
No comments:
Post a Comment