येळीचे बालगंधर्व
(लेख क्र. 6)
गाव म्हटलं की गावची यात्रा आली आणि येळीची यात्रा म्हणजे एक आगळी वेगळी यात्रा.कावड,छबिना, हंगामा, तमाशा, मिठाईची दुकाने खेळणीची दुकाने इ .खूपच भारी. येळीची यात्रा ही हनुमान जयंती नंतरच्या पहिल्या सोमवारी गावचे ग्रामदैवत येळेश्वराची यात्रा भरते.
यात्रा आली की यात्रा निमित्त नवीन नवीन नाटक हे दरवर्षी श्री .दत्त नाटक मंडळ हे सादर करत असे. नाटकाचे सर्व प्रयोग हे आपल्या गावातील सध्याचा जो बाजार तळ आहे ना तेथे म्हणजे पूर्वेला ज्या दुकाना आहेत ना त्या ठिकाणी या नाटकाचे प्रयोग होत असे.आपल्या गावात कधी ही कणात लावली नाही .फक्त स्टेजवर नाटक केले.स्टेज च्या माघे कलाकार साठी एक ड्रेसिंग रूम केली जात असेल. स्टेज चे तोंड हे नेहमी मंदीराकडे असायचे.संपूर्ण गावातील महिला मंडळ,लहान मुले, पुरुष , म्हातारे माणसे हे नाटक पाहण्यासाठी येत असे. विशेष बाब म्हणजे या नाटक मंडळात काम करणारे सर्व कलाकार हावशी होते.घरची परिस्थिती ही जेम तेम होती . तरी पण अभिनयाची आवड म्हणून ते हे सर्व करत असे. गावाच्या यात्रेत कधीच या नाटक मंडळाने तिकीट लाऊन नाटक सादर केले नाही. सर्व गावकार्यसाठी व यात्रेला येणाऱ्या पंचकृषित पाहुण्या साठी ते फ्री असे. तरी पण ज्यांना हे नाटक आवडले ते लोक नाटकाला बक्षीस देत असे आणि त्यांनी दिलेले बक्षीसाची रक्कम ही लाऊड स्पीकर मध्ये पुकारली जात असे .
नाटकसाठी लागणारे साहित्य म्हणजे साऊंड सिस्टम, कणात , लाईट व इतर सामग्री हे सर्व काही बाबूलाल पाटील यांच्या श्री.दत्त नाटक मंडळाकडेच असायची. नाटकातील कलाकारांची वेशभूषाकार हे येळी पासून खूप अंतर असलेल्या पैठण येथून आणले जाई.येळी ते पैठण हे अंतर खूप मोठे होते त्यावेळेस पैठण येथील पेंटर_करीम_भाई वेशभूषाकार म्हणून खूप प्रसिद्ध होते. त्यांना या कलाकारांचे वेशभूषा करण्यासाठी आवर्जून बोलवलं जात असे.आपल्या यात्रेच्या अगोदर पैठणची यात्रा असे .आपल्या गावातील मंडळाची लोक तेथे जात असे.तेथे गेल्यानंतर ते पेंटरची भेट घेत व या वर्षी नाटक कोणते बसवले आहे ,त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे .याची यादी ते पेंटरला देत असे आणि यात्रा कधी आहे त्यांना सांगितले जाई .ठरल्या दिवशी सर्व साहित्ये आपल्या सायकलवर घेऊन पेंटर करीमभाई हे येळी येथे येत असे .करीमभाई पेंटर चे एक वैशिष्ट्य होते की ते जेव्हा ते कलाकारांची वेशभूषा करत असे तेव्हा त्या नाटकातील पात्रा मध्ये आपल्या कलेंनी जिवंतपणा आणत असे .इतका सूंदर मेकअप ते करत असे. त्यावेळी ते सर्व साहित्याचा मोबदला म्हणून त्यांना ७०-१०० रु. दिले जात असे .गावची यात्रा म्हटलं की सर्वांचे नातलग ,मुली, जावई, बहिणी, यात्रेचे निमंत्रण दिले जाई आणि गावातील लोक बाहेर कोठे पण असू द्या .या यात्रेला नक्कीच ते गावाकडे येत असे.
एकदा काय झाले आपल्या गावातील पुढार्यांनी पाथर्डी येथील नेते मंडळी यांना यात्रेचे निमंत्रण दिले . बाबूजी आव्हाड हे पाथर्डी चे आमदार होते . खास करून गावातील नेते मंडळी यांनी त्यांना यात्रे साठी बोलवले होते .नाटक सुरू होण्यास वेळ होता म्हणून कलाकारांची भेट घेण्यासाठी ते स्टेज च्या पाठीमाघे असलेल्या ड्रेसिंग रूम मध्ये गेले. कलाकारांनी त्यांना पलंगावर बसण्याचा आग्रह केला पण बाबूजी आव्हाड मात्र त्या पलंगावर बसण्यास तयार होईना .तेव्हा बाजूला उभा असलेल्या बाबूलाल पाटील यांच्या एक गोष्ट लक्ष्यात आली ती म्हणजे पलंगावर जी स्त्री बसली आहे. त्यामुळे ते त्या पलंगावर बसत नाही.स्त्री च्या बाजूला आपण कसे बसायचे असं विचार बाबूजी आव्हाड याच्या मनात येत होता. हे लक्ष्यात येताच बाबूलाल पाटील त्यांना म्हणाले ती कोणी बाई माणूस नाही हो तो आपला उत्तम_तान्हाजी_बडे आहे. आणि ड्रेसिंग रूम मध्ये एकच हस्यां उडाला .आगदी हुबेहूब स्त्री वेशभूषा आणि मेकअप पैठणचे करीम भाई पेंटर यांनी केली होती. त्यामुळे बाबुजी आव्हाड यांच्या ही स्त्री आहे की पुरुष हे ओळखुच शकले नाही. त्याचे कारण होते पेंटर करीम भाई यांनी केलेले मेकअप आणि उत्तम बडे यांची स्त्री पत्रातील अदाकारी. स्त्रीचे पत्र जेव्हा ते करत असे ना. तेव्हा प्रेक्षकांनाच काय पण त्यांना ओळ्खणाऱ्याना पण ते पुरुष आहे की स्त्री हे लवकर लक्ष्यात येत नसे .उत्तम बडे हे स्त्रीचे पात्र खूप सूंदर रित्या सादर करत असे त्यांनी सुरवातीच्या काळात श्री.दत्त नाटक मंडळातील अनेक नाटकात स्त्रीचे पात्र हुबेहूब निभावले. हे पात्र येळी पंचकृषितील प्रेक्षक वर्ग कधीच विसरू शकणार नाही .उत्तम तान्हाजी बडे आणि अश्रूबा यादव बडे हे नंतरच्या काळात जागरण गोंधळ करत असे.त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरही कलेच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करून नावलौकिक मिळवला.
✍🏻पठाण तनवीर सर✍🏻
8380937788
No comments:
Post a Comment