येळी गावचे पाहिले सरपंच
आपल्या गावाची परंपरा खूप महान आहे .खूप चांगले चांगले व्यक्तिमत्व या गावाने दिले आहे. त्यांच्यामुळे आपल्या गावाचे तालुक्यात,जिल्ह्यात चांगले नाव झाले. हे बोलणे काही वावगे ठरणार नाही. हे ही तेव्हडे च खरे आपला देश स्वतंत्र झाला आणि आपल्या देशाची राज्यघटना ही आमलात आली.आपल्या राज्यघटनेत तरतूद होती की, गावाचा कारभार पाहण्यासाठी गावातील लोकांनी निवडणुकीच्या माध्यमातून किंवा सरळ निवडीतून सरपंच निवड करायची असे संविधानात होते.
म्हणून पहिली ग्रामपंचायत निवडुन ही *सन 1955* ला लागली गावचे पहिले सरपंच कोण होणार ? हा प्रश्न निर्माण झाला .या साठी बरेच नावे समोर आली पण त्या काळात येळी गावचे एक प्रतिष्ठित नागरिक त्यांचे नाव होते *श्री.धोंडीराम आबाजी ढोले पाटील*. धोंडीराम पाटील हे गावात प्रतिष्ठित नागरिक होते त्यांचा मोठा चिरेबंद वाडा ,मोठी शेती, गावात चांगला मान त्यांना होता .सर्व लोकांत त्यांचे उठणे बसणे होते. गोरगरीबांना मदती साठी तत्पर असत म्हणून काही लोकांनी तुम्हीच सरपंच पदासाठी उभे राहावे असे सुचवले.
जेथे निवडणूक आली तेथे विरोधक नसेल तर ती निवडणूकच काय .आज काल आपण निवडणूक पाहतो .आपल्या मतदाराला आपले प्रचार चिन्ह समजावे म्हणून नवीन नवीन शक्कल लढवली जाते . तुम्हाला हे नक्की सांगावसे वाटेल की त्या काळात निवडणूक प्रचाराचे जास्त साधन नव्हते. तेव्हा धोंडीराम पाटील यांना निवडणूक चिन्ह मिळाले तर ते होते *बैलजोडी*.
आता आपला प्रचार कसा करायचा आपले निवडणूक चिन्ह सर्वांनपर्यत कसे पोहोचायचे .तेव्हा एवढी अवगत प्रचार यंत्रणा नव्हती , साधने नव्हती .प्रचार तर करायचा आहे. म्हणून त्या वेळेस धोंडीराम पाटलांनी प्रचारासाठी एक शक्कल लढवली .आपलं निवडणूक चिन्ह सर्वांना कळावे म्हणून आपल्या घरातील बैलजोडीला पोळ्याच्या बैला सारखी सजवले आणि रात्रीच्या वेळेस हातात मशाली घेऊन .सनई - पिपाण्या, वाद्य वाजून आपली बैलजोडी घेऊन गावातून मिरवणूक काढली आपले निवडणूक चिन्हाचा प्रचार केला. पाहा मित्रांनो असा प्रचार त्यावेळेस त्यांनी केला .ते निवडून आले आपल्या गावचे पहिले सरपंच होण्याचा मान धोंडीराम आबाजी ढोले पाटील यांना मिळाला .
येळी गावचे पहिले सरपंच होण्याचा मान त्यांना सन 1955 या साली मिळाला .त्याचा सरपंच पदाचा कार्यकाळ हा सन 1955 ते सन 1960 हा राहिला .आपल्या कार्यकाळात त्यांनी आपल्या गावाच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या आपल्या गावाचे नाव तालुक्यात तसेच जिह्यातही गाजवले ते त्यावेळेस लोकल बोर्डचे सदस्य झाले .निश्चितच *कै..धोंडीराम आबाजी ढोले पाटील* यांचे कार्य हे गावाच्या विकासाठी योगदानी राहिल
No comments:
Post a Comment