रुग्णसेवक ते जनसेवक
येळी गावाची दुसरी पंचवार्षिक आली होती. आता परत गावात निवडणुक होणार होती. त्यात दोन मोठे गट होते.जेव्हा प्रतिस्पर्धी चांगले असता तेथे मात्र चांगलाच घाम निघतो. तसंच सन १९६० च्या ग्रामपंचाय निवडणूकी मध्ये झाल. त्यात दोन्ही गटाचे समसमान लोक निवडून आले.आता सरपंच कोण होणार कोणाला सरपंच कारायचे या साठी वाटा घाटी चालू झाल्या. खूप वेळ गेला पण सरपंच पदाचा तिढा मात्र काही मिटेना शेवटी काय कारावे हा प्रश्न सर्वां समोर निर्माण झाला.निवडून आलेल्या सदस्या मध्ये अल्पसंख्याक समाजाचे एक उमेदवार होते .निवडणुकीत निवडून आलेले होते. त्यांना या वाटा घटीचे काही घेणे देणे नव्हते. आपल्या गल्लीतील सर्व लोकांच्या सांगण्यावरून ते प्रेमापोटी उभा राहिलेले त्याकाळी अपेक्षेपेक्षा भरघोस मतांनी लोकांनी निवडूनही पण दिल.
बिनविरोध सरपंच
इकडे सरपंच कोण होणार यावर चर्चा चालू होती .पण सरपंच कोणाला करायचे हे मात्र ठरत नव्हते त्याच वेळेस बैठकीत बसलेले कै.बाबुराव फुंदे यांची नजर रस्त्याने जात असलेल्या भाऊ वर पडली ते लगबगीने हातात आपली पिशवी आणि बरोबर एक व्यक्ती असे मंदिराकडे जातांना दिसले .तेव्हा लगेच कै.बाबुराव फुंदे यांच्या डोक्यात एक कल्पना आली ते सर्वांना म्हणाले आपले समसमान सदस्य आहे. आपण एक काम करू या का भाऊ ना आपण सरपंच करू, गावाला आपलेसे वाटणारे भाऊ .नाहीतरी त्यांना कोणी विरोध करणार नाही .हे त्यांना ठाऊक होत.नाहीतरी त्यांचे एकच घर आहे .जशेच भाऊंचे नाव सुचवले तसाच सरपंच पदाचा वाद शांत झाला आणि सर्वांनी एका शब्दात त्याच्या नावाला होकार दिला,संमती दिली . थोड्या वेळाने भाऊ परत येतांना दिसले सर्वांनी त्यांना बोलवलं भाऊ इकडे या,कोठे गेले होते . एक जणाचे पोट खूप दुखत होते. म्हणून त्याला पाहण्यासाठी आणि औषध गोळ्या देण्यासाठी गेलो होतो.काय म्हणता.! सर्वांनी जो निर्णय घेतला तो त्यांना सांगण्यात आला. तेव्हा ते म्हणाले अजिबात नाही! मी आणि सरपंच, ते मला जमणार नाही . मी एक डॉक्टर आहे. माझे काम रुग्णसेवा करण. हे काही आपल्या डोक्यात बसत नाही ते मला नाही जमणार . मी नाही करू शकणार मला माफ करा मी निघतो असे म्हणून ते निघायला लागले तर त्यांना बाकीचे म्हणाले ही पण समाजसेवाच आहे .त्यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांची मन धरणी केली.सर्वांनूमते बिनविरोध भाऊ ना सरपंच केल.या निवडीतून भाऊ बद्दल गावाच असणार प्रेम दिसून येत.!
भाऊ म्हणजे एक प्रतिष्ठित नागरीक पण अल्पसंख्याक येळी गावात बोटावर मोजण्या इतके मुस्लिम समाजाचे घरे.भाऊ म्हणजे डॉ.नामदार बापूखाँ पठाण नामदारभाऊ यांचे कुटुंब खरोखरच सेवाभावी कुटुंब होते.नामदार भाऊ यांचा जन्म हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालेला. नामदार भाऊ यांना लहान पणा पासून पैलवान की ची खूप आवड होती. परंतु त्यांनी आपले आयुष्य हे जन सेवेसाठी अर्पण केले . त्यांचा विवाह धामणगाव येथील मेहताबबी यांच्याशी झाला .हे दोन्ही दाम्पत्य खूप शांत आणि संयमी व कष्टाळू होते. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजणारे हे दाम्पत्य नामदार पठाण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळा पासून ते येळी येथे आपली रुग्णसेवा देत होते . नामदार पठाण यांना रूबाब आणि बिजान या दोन मुली तसेच पाच मुले त्यात मोठा मुलगा डॉ.बाबूलाल दुसरा मुलगा डॉ.बाबासाहेब,तिसरा चाँद, चौथा गुलाब आणि पाचवा डॉ.कबीर अस भाऊंच कुटूंब होत.
नामदार भाऊ आपला डॉक्टरकीचा व्यावसाय ते खूप इमानदारीने करत असे. रात्रीबेरात्री कोणी ही रुग्ण त्यांच्या कडे येत असे. एव्हडच काय परगावावरून एखादा रुग्ण आला की ते त्या रुग्णांना जेवण करूनच पाठवत असे .पैसे असो किंवा नसो.पण इलाज करणारच .त्यावेळेस त्याचा कडे एक घोडा असे. ते त्या घोड्यावर बसून टाकळी,आखेगाव, कोरडगाव,सोमठाणे,सुसरे नागलवाडी अशा अनेक ठिकाणी ते जात असे रुग्णांची सेवा करत असे. त्यामुळे त्यांचा पंचकृषित खूप चांगला प्रभाव होता.जनसामान्यांत त्यांना मानणारा चांगला वर्ग होता. आता त्यांना रुग्णसेवा करता करता गावाचा पण कारभार पाहायचा होता.ज्या प्रमाणे रुग्णाची सेवा केली त्याच प्रमाणे गावाची सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती .नामदार भाऊ ने त्या संधीचे सोने केले असे म्हणणे वावगे ठरणारे नाही.
महात्मा गांधी विद्यालय
म्हणतात ना नवा गडी नवा राज सरपंच पद आले आणि आता विकासाचे काय ..! सगळे नवे जर गावाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. म्हणून गावाच्या विकासाची सुरवात ही शिक्षणा पासून केली पाहिजे. त्या काळात गावात जीवन शिक्षण मंदिरयेळी ही १ ली ते ७ वी पर्यंत होती तिची स्थापना दि .१/०१/१९०५ ची रोजी झाली होती . सन १९६० च्या वेळेस या शाळेचे मुख्याध्यापक कै.विश्वनाथ कराड गुरुजी हे होते. नामदार भाऊ आणि कै.विश्वनाथ कराड गुरुजी जिवलग मित्र होते. गुरुजी म्हणाले आपल्या गावात ७ वी पर्यंतच शाळा आहे आणि पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर पाथर्डी येथे जावे लागत होते .म्हणून गुरुजींनी भाऊच्या मदतीने पुढकर घेऊन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे महात्मा गांधी विद्याल्याची स्थापना केली. ही शाळा आणण्यासाठी गुरुजींचा सिंहाचा वाटा राहिला .(आपण त्यांच्या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत)
गावात आली पहिली सहकारी सोसायटी
त्या वेळेस आपल्या येळी गावचे भाऊसाहेब कै.दत्तोपंत कुलकर्णी हे होते. नामदार भाऊयांनी सर्वांना बरोबर घेऊन गावात पहिले सहकारी सोसायटीचे बांधकाम करण्याचे ठरले आणि ते बांधकाम सन १९६१ ला झाले .पहिली सहकारी सोसायटी गाव हिता साठी बांधण्यात आली .
शासकीय गोडाऊन
सोसायटीची स्थपणा झाली आणि सोसायटी चा कारभार वाढला. आता शेतकऱ्याने दिलेले मालची आवक वाढू लागली. धान्य पाथर्डी येथे पाठवले जाऊ लागले .परंतु पाथर्डी येथे आवक जास्त वाढू लागल्याने धान्य घेत नसे आणि इकडे गावात आवक तर वाढली .आता धान्य साठवयाचे कोठे म्हणून इकडे तर जागा कमी पडू लागली त्या साठी काय करायचे म्हणून आपण शासकीय गोडाऊन बांधू अशी कल्पना नामदार भाऊ यांना आली. कै.दत्तोपंत कुलकर्णी यांच्या पाठ पुराव्यामुळे येळी मध्ये पहिले या पंचकुशीतील शासकीय गोडाऊनची निर्मिती झाली.
शासकीय जनावरांचा दवाखाना
येळी गावातील लोकांचे मुख्य व्यवसाय शेती होता आणि त्यावेळेस शेती साठी आणि दूध दुपत्य साठी त्याच्या कडे जनावरे खूप होती. जर या मुक्या जनावरांचे काही दुखायला लागले तर त्यांना त्या काळात पाथर्डी येथे घेऊन जावे लागत होते. कारण त्यावेळेस फक्त पाथर्डी येथे होता शासकीय जनावरांचा दवाखाना आपल्या येळीत झाला पाहिजे सर्वांना विश्वासात घेऊ पहिला या पंचकुशीतील शासकीय जनावरांचा दवाखाना येळी येथे आणला.
गावाच्या विकासासाठी सरपंच .डॉ.नामदार पठाण यांचे खूप मोठे योगदान राहिले. त्यांचा कार्यकाळ *सन१९६० ते १९६५* हा होता.भाऊंना मोलाची साथ त्याकाळी मिळाली ती तरूण तडपदार मुलाची म्हणजे डाॅ.बाबुलाल पाटील यांची. त्याकाळात आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून सुवर्ण काळ होता हे म्हणणे वावगे ठरणार नाही.
✍🏻तनवीर पठाण सर यांच्या लेखणीतून✍🏻
No comments:
Post a Comment