विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड
शाळा आदर्श शिक्षण संस्थेची आदर्श विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड या मागास व कामगार असणाऱ्या परिसरात ज्ञान हे नदीप्रमाणे वाहत राहिले पाहिजे ही संकल्पना घेऊन बीड जिल्ह्याच्या माजी खासदार माननीय केशरबाई क्षीरसागर यांनी या भागाचा शिक्षणाचा अभाव लक्षात घेता 1965 सालि या शाळेची स्थापना पेठ बीड या भागात केली आज या संस्थेचा कारभार त्यांचे पुत्र माननीय जयदत्त अण्णा क्षीरसागर हे संस्थेचे सचिव म्हणून स्वतः लक्ष देऊन पाहत आहेत आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासकीय कामकाज माननीय राजू मसाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिले जाते शाळा हे माझे कुटुंब आहे अशा मानणाऱ्या शाळेच्या कुटुंबप्रमुख मुख्याध्यापिका किर्ती ताई पांगरकर सर्व शिक्षकांना सोबत घेऊन शाळेला या भागात नावलौकिक मिळून केले आहे आपल्या विविध कल्पना मधून त्यांनी अनेक उपक्रम या शाळेत राबवले आहेत प्राथमिक शिक्षण हा जीवनाचा पाया असतो शाळेची सुरुवात ही या लहान जीवांना नवीन असते त्यांच्या कोवळ्या मनावर दडपण नसावे त्यांचा शाळेचा पहिला दिवस हा उत्साहात जावा म्हणून या लहानग्यांचे स्वागत शाळा वाजत-गाजत करते त्यांचे फुलांनी स्वागत करते.
बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रशिक्षण घेऊन तयार झालेले अनुभवी शिक्षक हे या शाळेचा गाडा पुढे नेण्यासाठी तत्पर आहेत कष्टकरी कामगार श्रमिक वर्ग असलेला हा परिसर हातावर पोट भरणारे कुटुंबे सकाळी कामाला गेले तर संध्याकाळी चूल पेटते अशा आर्थिक विवंचनेत जगणारी ही माणसे त्यांच्या मुलांची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आपली शाळा मुलांच्या गणवेशाचा खर्चही स्वतः उचलते एक सारख्या गणवेशात बसणारी मुले आणि मुली त्यांच्या नवीन गणवेश यांचा रंग आणि पुस्तकांचा सुगंध मनामध्ये रुजवून शाळेत जेव्हा परिपाठ आला बसतात तेव्हा त्या त्यांच्या दिवसाची सुरुवात संगित्मय प्रार्थना नी समूह गीतांनी व कवितांनी होते त्यातून नैतिक मूल्य जोपासली जातात वक्तृत्व कर्तृत्व व नेतृत्व हे शाळेतूनच घडते त्यांचा पाया शाळेतच रचला जातो या कलागुणांना वाव देण्यासाठी मुलांमध्ये स्टेज करीत निर्माण व्हावे मुले पुढे यावीत यासाठी विविध स्पर्धांमधून मुलांमध्ये नेता-अभिनेता कलावंत शिक्षक चित्रकार संगीतकार शोधण्याचा प्रयत्न शाळेतील शिक्षक करत असतात. व त्यांना प्रोत्साहन देत असतात.
जे विद्यार्थी या भट्टीतून तावून सुलाखून निघतात त्यांचा गुणगौरव शाळा मोठ्या थाटामाटात करते विज्ञानाचे जग काय असते हे बाल मना समजावे नवीन शोध नवीन संशोधने ज्या शास्त्रज्ञांनी केली त्यांचे आविष्कार हे विज्ञान प्रदर्शनातून शाळेत स्वतः मुलांच्या हातून पाहताना आनंद होतो शिक्षण अधिकाऱ्यांपासून तर पालक या विज्ञान प्रदर्शनाचा आनंद घेतात झाडांचे महत्त्व मुलांना समजावे म्हणून शहरातून वृक्षदिंडी काढून हीच झाडे शाळेच्या परिसरात लावली जातात सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी राबवलेला उपक्रम सह्याद्री देवराई या वृक्षांचे जे संमेलन भरले त्या संमेलनातही विनायक शाळा सामील झाली खिलाडू वृत्ती मुलात निर्माण व्हावी त्यांच्यातला खेळाडू मैदानात यावा तो तालुक्यापासून तर राज्यापर्यंत खेळावा शाळेचे नाव लवकि करण्यासाठी त्याने मैदाने गाजवावी यासाठी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते आदर्श व्यक्ती होण्यासाठी आदर्श लोकांचे चारित्र्य जाणे फार महत्त्वाचे आहे महापुरुषांच्या ओळख होणे महत्त्वाचे आहे यासाठी महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या या माध्यमातून मुलांना यामा पुरुषावर भाषणे तयार करायला लावणे व त्यांच्यातील मुले जोपासणे फार महत्त्वाचे असते असे उपक्रमही शाळेत राबवले जातात .
एक आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्या मुलांमधील कला जेव्हा आई-वडील स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात तेव्हा त्यांचे डोळे भरून येतात आणि अभिमानाने छाती फुगते व आपला मुलगा मुलगी स्टेजवर जेव्हा हजारो लोकांच्या समोर आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करते तेव्हा खरंच शाळेचे नाव लौकिक तर होणारच देशाचा अभिमान मुलांच्या मनात रुजावा यासाठी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दिवशी शहरातून प्रभात फेरी काढून भारत माता की जय या जयघोषात प्रभात फेरी शाळेत आल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या हाताने झेंड्यांना वंदन केले जाते
तनवीर पठाण