शालेय क्रिकेटच्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये गुरुकुल इंग्लिश स्कूलने दणदणीत विजय मिळवला. ----------------------------------- *फायनल मध्ये कृष्णा गायकवाड आणि अरशान पठाण चमकले* ----------------------
बीड:- दि. 16.09.2024 रोजी शालेय क्रिकेटच्या तालुकास्तरीय स्पर्धा शिदोड येथील डी. एस. के.क्रिकेट ग्राउंड वर घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये एकूण 17 शाळांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये खेळत असताना गुरुकुल इंग्लिश स्कूल ने प्रथम मॅच मध्ये शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल, द्वितीय मॅच मध्ये ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल, सेमी फायनल मध्ये नारायण इंग्लिश स्कूल तसेच फायनल मध्ये गणेश विद्यालय या संघासोबत अटीतटीच्या सामन्यांमध्ये गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत गणेश विद्यालयाचा पराभव दणदणीत विजय मिळवला. या स्पर्धा पार पाडण्यासाठी तालुका समन्वयक उज्वल गायकवाड, संजय धस, विस्तार आधिकारी अभिजीत तांदळे,अझहर शेख, गायकवाड सर संतोष कवठेकर,शैलेश जाधव ,गाल्फाडे , तनवीर पठाण , उपस्थितीमध्ये उद्घाटन झाले व स्पर्धा पार पडण्यास सहकार्य लाभले विजयी संघामधील खेळाडू कृष्णा गायकवाड, आरशान 0पठाण यांनी नाबाद 70 रणाची भागेदारी पाच ओव्हर मध्ये केली बॉलिन मध्ये आरशान पठाण शेवटच्या शतकात फिरकी ने गुरुकुल संघाचं विजय निश्चित केला .या सामन्यामध्ये कृष्णा गायकवाड चे तुफानी अर्धा शतक ( 55 रन) करून विजय मिळवण्या साठी मोलाचे योगदान दिले, सार्थक कोकरे,अन्वित सुभेदार, संग्राम तळेकर,मोहम्मद नबील, संविधान सावते,रणवीर राठोड, दिप काळे, शशांक सारंगकर, दुर्गेश झांबरे, आर्यन कुटे, कैवल्य मोहिते, शालू त्रिभुवन वरील खेळाडू 14 वर्षाखालील शालेय क्रिकेटच्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये बीड तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील या विजयी खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक कल्याण माने , रामदास गिरी, महेश गव्हाणे यांच्या मुलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा डॉ. विनिता ढाकणे, सचिव डॉ.राजेंद्र ढाकणे, कार्यकारी संचालक अखिलेश ढाकणे, प्राचार्य शीतल सर्वज्ञ, उपप्राचार्य अमोल कपूर, सारा मॅम, गणेश इंगोले सर, क्रीडा शिक्षिका वाघमारे मॅडम अन्य प्रशिक्षक व पालकांनी मुलांचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक.







No comments:
Post a Comment