शिक्षणातील दीपस्तंभ
लेख 09 दि. 31/05/2021
शिक्षक म्हणजे आपल्या भविष्याचे शिल्पकार. शिक्षक हेच आपल्या जीवनाला मार्ग दाखवतात आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असे काही शिक्षक असतात की त्यांना आपण आपल्या आयुष्यत कधीच विसरू शकत नाही त्याचे कार्य हेच त्याची संपत्ती असते.असे शिक्षक इतिहास घडवतात आणि समाजामध्ये आपला एक वेळ ठसा उमटवतात .
सकाळची वेळ होती मुले सर्व एक ओळीत मध्ये उभे होती .गावाच्या बाजार तळावर काही वयस्कर मंडळी बसली होती .अचानक त्याच्या कानावर एक सुरेल आवाज पडतो ते मंत्रमुग्ध होतात तेथेच बसलेले इतर माणसं म्हणतात किती सुरेल आवाज आहे ना असं वाटत ऐकतच राहावे....शाळेचा परिपाठ असो की पारायण असो आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे व्यक्तिमत्व एक आदर्श शिक्षक , विदयार्थी प्रिय , शिस्तप्रिय , प्रामाणिकपणा आणि आध्यत्मिक सखोल ज्ञान असणारे येळी गावचे व्यक्तीमत्व ए .का. कराड गुरुजी म्हणजे एकनाथ काशिनाथ कराड गुरुजी. गुरुजी चे राहणीमान म्हणजे अगदी साधे सरळ पांढरी टोपी , पांढरा शुभ्र सदरा, पांढरे धोतर ते पण एक टांगी रस्त्याने चालताना धोतराचा एक टोक नेहमी आपल्या हातात असे त्यांना पांढरे कपडे खूप शोभून दिसत असे.
जीवन शिक्षण मंडळ शाळेच्या कार्यरत असताना सुरवातीला सह शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले.त्यांचे जायभाये गुरुजी,नजन गुरुजी,सोळसे गुरुजी,कराड गुरुजी ,हे त्याचे सहकारी होते. गुरुजी हे मुलांना सुरवातीला म्हासू बडे गुरुजींचा वाडा येथे भरत असलेल्या शाळेत शिक्षण देत असे .शाळेची सकाळची प्रार्थना म्हणजे परिपाठ याची सर्व जवाबदारी ही विश्वनाथ कराड गुरुजींनी ए .का .कराड गुरुजी यांच्यावर सोपवली होती .शाळेचा परिपाठ म्हणजे ए का कराड गुरुजी अस समीकरण झाले त्यावेळे निमार्ण झाले होते.देशभक्तीपर गीते,समूहागीते सुमधुर आवाजात ते गात असे व विद्यार्थ्यां कडुन गाऊन ही घेत असत पसायदान म्हणण्यात तर गुरुजींचा हातखंडाच होता.
शाळेत मुलांना ते खूप आवडत. शाळेचा आरसा असतो तो शाळेचा परिपाठ .या परिपाठामध्ये चांगले संस्कार ,चांगल्या सवयी यांचे धडे दिले जात असे .ए का कराड गुरुजी खूप हुशार आणि बुद्धिमान होते तस पाहिले तर मुलांना सर्वात अवघड जाणारा विषय म्हणजे गणित .या गणिताची भीती जर मुलांच्या मनातून काढली असेल तर ते म्हणजे ए का कराड गुरुजीनी .आवडत विषय गणित,गणित विषयावर असलेले प्रभुत्व ,गणित शिकवण्याची त्यांची एक वेगळीच पद्धत होती. अगदी हसून खेळून सोप्या पद्धतीने गणिताची भीती ते मुलांच्या मनातून नाहीशी करत असत.त्याकाळात सातवीला बोर्ड परीक्षा होत असे त्यासाठी ते खूप परिश्रम घेत. त्यावेळेस मुले हे परीक्षांसाठी पाथर्डी येथे जात असें तेव्हा गुरुजी ज्या दिवशी पेपर आहे त्याच्या अगोदरच्या रात्री मुलांना गणिता विषयी असलेल्या आडी आड़चन विचारून त्यांच्या कडून ते सराव करून घेत असत. या काळात तालुक्यात जीवन शिक्षण मंदिर येळी या शाळेला आदर्श पुरस्कार प्राप्त झाला होता .
ए. का. कराड गुरुजींना आध्यत्मिक विषयी खूप आवड होती .गावात सप्ताह असो की,गावात पारायण असो ,गणपती उत्सव असो गुरुजी नेहमी धार्मिक कार्यक्रमात आग्रह भागी असत .गुरुजी हे गणिता बरोबर च संस्कृत विषयांचे गाडे अभ्यासक होते. आध्यत्मिक विषयी त् सखोल ज्ञानी असल्यामुळे त्यांनी दोन पुस्तके लिहिली एक संत श्रेष्ठ वामनभाऊ ओवी चरित्र गाथा , व
शिक्षण म्हणजे फक्त वही-पेन नव्हे तर बुध्दीलासत्याकडे,
भावनेला माणूसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग
म्हणजे शिक्षण"
तो शिक्षणाचा मार्ग ए.का.कराड गुरुजी आपण तयार केला. म्हणून आपल्या सारखे शिक्षक सर्वांना लाभूदे. या लेखाच्या माध्यमातून आपणास भावपूर्ण श्रद्धांजली...!💐💐
✍🏻तनवीर पठाण सर
8380937788